मुंबई: राजकारणात अनेकदा पक्ष नेते एकमेकांवर टोकाची टीका करतात मात्र, कधी कधी हेच नेते एकमेकांसमोर आले की, काही झालंच नाही असं वागताना आपल्याला दिसतात. मात्र, शिवसेना फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यातील कटूता अगदी आहे तशीच आहे, असं काहीस चित्र आज विधानभवनाच्या परिसरामध्ये दिसून आलं. एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये एक दृश्य कैद झाले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांशी बोलताना दिसतात, त्यांनी हस्तांदोलन केले, एकमेकांना नमस्कार केलेला आहे. मात्र, त्याच वेळेला त्यांच्या मागून एकनाथ शिंदे हे सुद्धा चाललेले होते, मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं सुद्धा नाही. देवेंद्र फडणवीसांना भेटून पुढे जाताना उध्दव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेंना इग्नोर केल्याचं दिसून आलं आहे. 


काय झालं संभाषण?


फडणवीस आले, नमस्कार केला, उद्धवजी म्हणाले - काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही. त्यावर सगळे (अंबादास, मिलिंद नार्वेकर) सगळे खळाळून हसले, आणि पुढे गेले.


नेमकं काय घडलं?


अर्थसंकल्पाच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या समोर आले आणि त्यावेळेला त्यांनी एकमेकांना हसत हसत नमस्कार केला. हातात हात दिला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे देखील उपस्थित होते, या सर्व नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही क्षण बातचीत केली, हसत हसत नमस्कार केला, त्या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलं होतं. मात्र त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मागून एकनाथ शिंदे आले होते, त्यांची देहबोली पाहून कळतंय की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले देखील नाही, आणि फडणवीसांच्या मागोमाग लगेच एकनाथ शिंदे देखील तिथून पुढे निघून गेले. 


जेव्हा उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांकडे पाहून स्मित केलं, हातात हात दिला. मात्र, त्यांच्याच मागून आलेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिले देखील नाही. त्यांनी एकमेकांना इग्नोर केल्याचा दिसून आलं. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्व नेते खाली लॉबीमध्ये आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची समोरासमोर भेट झाली. एकमेकांसमोर ते आले. त्यानंतर त्यांनी नमस्कार केला. त्याचवेळी पाठीमागच्या बाजूने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच मार्गाने लॉबीमध्ये आले. मात्र, त्यांनी एकमेकांना बघणं टाळलं आणि थेट एकनाथ शिंदे पुढे निघून गेले. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचे देखील काही क्षण भेट घेतली, त्यांनी देखील एकमेकांना नमस्कार केला. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणाहून जाताना ठाकरेंना इग्नोर केल्याचा दिसून आलं, त्यामुळे पक्षफुटीनंतर निर्माण झालेली कटूता अद्यापही तशीच आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


अनेक वेळा उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस एकमेकांवर टोकाच्या टीका करतात. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाची ही संस्कृती आहे की, एकमेकांच्या समोर आल्यानंतर हस्तांदोलन किंवा एकमेकांना नमस्कार करणे. एकमेकांना पाहून काही क्षण का होईना बोलणं. मात्र एकनाथ शिंदे यांच्या मनातील कटूता अजूनही त्यांच्या देहबोली मधून दिसत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस नमस्कार करताना दिसतात. एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करताना दिसतात. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना देखील अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जाऊन भेटणं किंवा काही क्षण त्यांच्याशी बोलणं. मात्र, त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समोरून जातात. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे यांना टाळलं आणि पुढे ते सभागृहात जायला निघाले, यामुळे पक्ष फुटी नंतरची जी कटूता आहे, ती अद्यापही असल्याचं दिसून येते.