Uddhav Thackeray : एकीकडे बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) देखील अडचणीत आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या विरोधकांकडून केली जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून भाजपवर हल्लाबोल केलाय. तसेच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावरही निशाणा साधलाय.  

उद्धव ठाकरे म्हणाले की, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? न्यू इंडिया बँक बुडाली. ती कोणामुळे बुडाली? यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदुत्व आहे का? माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे. मात्र भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

आत्ताचं सगळं विचित्र चाललंय

माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माझ्या हातात अजून प्रत आलेली नाही, असे म्हटले. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे. आमच्या बाबतीत न्यायालयाचा निकाल तीन वर्ष होऊन देखील तो अजून लागतच आहे.  तीन-चार न्यायाधीशांची कारकीर्द पूर्ण झाली, तरी तो निकाल लागलेला नाही. याबाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी, अशी जर का कोणी मागणी केली तर त्यात गैर काय? हे इतकेच न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिचा मान-सन्मान राखणार असतील तर त्यांनी आमच्या बाबतीत जो काही न्याय दिला, त्याला ते न्याय मानत असतील तर आत्ताचं सगळं विचित्र चाललं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Neelam Gorhe On Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं; नीलम गोऱ्हेंच्या विधानाने खळबळ, दानवे म्हणाले, ही नमकहरामी...

Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र