Jitendra Awhad on Manikrao Kokate : मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी ठोठावली आहे. यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले आहे. विधीमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. 

 3 मार्च पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी (दि. 23) विधीमंडळ  कामगार सल्लागार समितीची बैठक पडणार आहे. या बैठकीला आता सुरवात झाली असून विरोधी पक्ष नेत्यांची गैरहजेरी पाहायला मिळत आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे बैठकीला उपस्थित नाहीत तर जितेंद्र आव्हाड हे विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या केसच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सुनील केदार आणि राहुल गांधी यांना एक वेगळा न्याय आणि सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना एक वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jitendra Awhad :अनामिक गरिबांची हाय मंत्री कोकाटेंना लागली अन् 30 वर्षांनी का असेना पण सत्याचा विजय झाला; जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, आता बंदुकीचा परवानाही रद्द होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?