Uddhav Thackeray, at Mumbai : "बाळासाहेबांची घराणेशाही चालत नाही, पण गद्दाराच्या कार्ट्याला उमेदवारी देता. ज्या प्रमोद महाजनांनी भाजप वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली. पूनम तुमच्या पक्षात असली तरी प्रमोद महाजन आणि माझे भावासारखे संबंध होते", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.


उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे आपण जमलो आहेत. दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जमले आहेत. सगळे बेअकली आणि नकली आहेत. 4 जूनपर्यंत पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत. कारण 4 जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर केली. त्याप्रमाणे 4 जून ला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. तुमची मुंबईत पंतप्रधान म्हणून शेवटी सभा आहे.


लोक जमवतात जणू काही देशातील सर्व प्रश्न सुटलेत 


पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, मला काही लोकांची कीव येते. लोक जमवतात जणू काही देशातील सर्व प्रश्न सुटलेत. चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसलाय. पण हे भाडोत्री फौज घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आले आहेत. मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करुन पाहा. माझा महाराष्ट्र तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही. हा शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र, तो शाह मोदी आणि अंबानीचा होऊ देणार नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, माझा मर्द मराठा फुटणार नाही. 


सडलेली पानं झडली पाहिजेत, त्याशिवाय पालवी फुटत नाही


काही वेळेला एक गोष्ट बरी असते. निसर्गाचा नियम आहे. सडलेली पानं झडली पाहिजेत. त्याशिवाय पालवी फुटत नाही. भारतीय जनता पक्ष कचरा गोळा करणार पक्ष आहे. त्यांनी 400 पारचा नारा दिला. मग आपण नारा दिला अबकी बार भाजप तडीपार.. तुमच्यावर कोणत्या घराण्याचे संस्कार आहेत, माहिती नाहीत. तुमचे दरवाजे बंद करून आम्ही तुम्हाला गुजरातला पाठवून देऊ. कोविडमध्ये मी मोदी शहा सांगत होतो उत्तर भारतीय लोकांना रेल्वेने पाठवू द्या. मात्र हे नाही नाही म्हणत होते. लोकांना जमेल तस आम्ही थांबवत होतो.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा; इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही : एकनाथ शिंदे