Uddhav Thackeray on Article 370, श्रीरामपूर : "अमित शाह म्हणतात आम्ही कलम 370 रद्द केलं, त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलावे. आम्ही तुम्हाला 370 कलम रद्द करायला, जाहीर पाठिंबा दिला. पण पर्वा असीम सरोदे जे बोलले ते धक्कादायक आहे. असीम सरोदेंनी जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. ते म्हणाले मोदी सरकारने कलम 370 काढलेलंच नाही, त्यातील '370 ब' हा कॉलम आहे, त्याला यांना स्थगिती दिली आहे. त्या स्थगितीचा अर्थ काय? काश्मीरमध्ये बाहेरची माणसं जमिन घेऊ शकत नव्हते. ते आता जमिन घेऊ शकतात. त्या कायद्यानंतर सर्वात जास्त जमिन कोणी खरेदी केली? अदाणी यांनी केली. काल मोदी बोलले टेम्पो भरुन  पैसे दिले. त्या अदाणींनी जमिन खरेदी केली, असं सरोदे म्हणाले" असे  खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर केले आहेत. शिर्डी लोकसभा (Shirur Loksabha) मतदार संघातील श्रीरामपूर (Shrirampur) येथे ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.


अदानींना लिथियम मिळावे, यासाठी कलम 370 रद्द केलं


उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या मोबाईलमध्ये बॅट्रीज येतात, त्यानंतर आता वाहनं येणार आहेत. त्याच्यासाठी लागणाऱ्या बॅट्री आहेत. त्या बॅट्रीला लागणारे लिथियम तिथे मिळतं. ते अदाणींना मिळावे, यासाठी कलम 370 रद्द केलं. आम्हाला वाटलं मोठं काम केलं. आम्ही देखील भाबडेपणाने पाठिंबा दिला. काल मोदी बोलले टेम्पो भरुन  पैसे दिले. त्या अदाणींनी जमिन खरेदी केली, असा आरोपही ठाकरेंनी केला. 


कोणीही यायचे मराठी माणसाला बदनाम करायचे


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील उद्योग सगळे गुजरातमध्ये नेत आहेत. एका बिल्डरने मुंबईत सांगितले की, मुंबईत मराठी माणसाला घर देत नाही. आमच्या राज्यात तुम्ही आम्हाला बेघर करण्याची हिंमत दाखवा. तुमची दुकानं बंद केल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही. इतर राज्यांमध्ये माझी मराठी माणसं राहत नाहीत? पण कोठेही मराठी माणसं यांच्यासारखी मस्ती करताना दिसणार नाहीत. कोणीही यायचे मराठी माणसाला बदनाम करायचे, असं यांचं सुरु आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. कुटुंब नासवायची. महाराष्ट्राला बदनाम करतात. गुजरातला उद्योग धंदे नेण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मी मॅच फिक्सिंग करत नाही, बारणेंसाठी अजित पवारांची बॅटींग; कार्यकर्त्यांना सज्जड दम, अंगठीचं आमिष