Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या हा मुद्दा केंद्रस्थानी येऊ लागला आहे. काल पुण्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. मतदार याद्यांवर काम करा, नावं व्यवस्थित तपासा, असे आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. तर आज दहिसरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील हाच मुद्दा अधोरेखित केला. घराघरांत जा, मतदार यादी तपासा...कारण आपलं मत चोरी होत आहे. त्यामुळे ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी गंभीरपणे पार पाडली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंकडून एकाच मुद्द्यावर भर दिला जात असल्याने, पुढील रणधुमाळीत मतदार याद्यांचा विषय मोठ्या चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement


राज ठाकरे पुण्यात काय म्हणाले होते?


2016-17 पासून मतदानामध्ये काही तरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय. या सगळ्या गोष्ठींसाठी मी शरद पवारांना, सोनिया गांधींना भेटलो. महाराष्ट्रातील सगळे माझ्या सोबत आले. आयत्या वेळी सगळ्यांनी कच खाल्ली, असं राज ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले. मी त्याचवेळी सांगत होतो लोकसभेला निवडणुकीवर बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल. बाहेरच्या देशातून प्रेशर यायला सुरुवात होते, त्या वेळेला सगळ्यांचे डोळे उघडतील. तोपर्यंत डोळे उघडणार नाहीत, असं राज ठाकरेंनी सांगितले. आता राहुल गांधींनी प्रकरण बाहेर काढलं. मी केव्हापासून सांगतोय आपल्याला मतदान होत नाही, हे तुम्ही समजु नका मतांमध्ये गडबड आहे. आपली मतं चोरली जात आहेत. तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. तुम्हाला असं वाटत असेल लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. तर ते झुट आहे...लोकांनी आपल्याला मतदान केलंय. परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. हे मी शिवतिर्थावरील भाषणातही बोललो, असं राज ठाकरे म्हणाले. मतांची चोरी करत करत हे सत्तेत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप 132, शिंदे 56, अजित पवार 43...अशा एकूण 232 जागा मिळाल्या. एवढं संपुर्ण बहुमत मिळूनही संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा का होता?, कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता. कारण जे विजयी झाले त्यांना पचत नव्हतं. पराभुत झालेल्यांनाही पटत नव्हतं. सगळा मतांचा गोंधळ होता. त्या सगळ्या मतांच्या गोंधळातवरती सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या. याला जर निवडणुकीत उघडं पाडायचं असेल. तुम्हाला निवडून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवर काम केल्या खेरीज गत्यंतर नाही. तोपर्यंत विजय हाती येणार नाही, असा सूचना राज ठाकरेंनी दिल्या. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले?


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी शाखा भेटी सुरू केल्या आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी दहिसर येथे शाखा क्रमांक 4 ला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी सगळ्यांनी एक काम करायचं मतदार यादी तपासायच्या. पण सध्या मतं चोरी होताय. डोळ्यांमध्ये तेल घालून मतदार यादीत तपासा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या. 




संबंधित बातमी:


Raj Thackeray & Uddhav Thackeary: राज ठाकरेंनी 'दादू'ला शिवतीर्थवर बोलावलं, उद्धव ठाकरे पहिल्यांदाच 'राजा'च्या नव्या घरी जाणार, गणपती बाप्पा दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणणार!