Nagar: राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असताना राज्यातील महिला आयोग गांभीर्याने दखल घेत नसल्याचा वारंवार आरोप होत आहे. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा राजीनाम्याची मागणीही होत होती.  यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जोरदार टोला लगावला आहे... महिला आयोग काय करतंय तुम्हाला माहित आहे? आजच्या दिवशी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन असल्याने महिला आयोगाला सुट्टी असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. अशी प्रकरणे दररोज घडतात...त्यामुळे आमची मागणी आहे की, महिला आयोगाला पूर्ण वेळ काम करणारे अध्यक्ष हवे. एखाद्या पक्षाची प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षाची महिला कशाला हवी? कुठे तरी पक्षीय राजकारण महिला आयोगात सुरु असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर येथील महिलेच्या मृत्यूप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली आहे. श्रीरामपूर येथे 20 जून 2021 रोजी ज्योती मोहित साळुंखे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ज्योती साळुंखे  हीच 2017 मध्ये मोहित साळुंके याच्याशी विवाह झाला होता त्यानंतर काही दिवसांनी तिला त्रास सुरू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. 20 जून 2021 रोजी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे तिच्या पतीसह सासू-सासरे आणि नंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या वेळेला संबंधित पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंब्यांचं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केले आहे

नक्की प्रकरण काय होते?

विहीर खोदण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा मानसिक छळ आला. या छळास कंटाळून विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ज्योती मोहित साळुंके वय 28 असे या विवाहितेचे नाव आहे. साळुंखे हिचे नातेवाईक नानासाहेब अनर्थे रा. चंद्रपूर ता. राहता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणातून आरोपी पती मोहित लक्ष्मण साळुंके, सासरा लक्षमण साळुंके, सासू मीना लक्षमण साळुंके यांना पोलिसांना अटक केली होती.  

हेही वाचा:

माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप