मुंबई: राज्यातील 288 विधानसभा आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. आज महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे या संदर्भातला प्रस्ताव समोर ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष उद्या निवडला जाणार आहे आणि त्याआधी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं  हा एक प्रकारचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे यासंदर्भातला प्रस्ताव समोर ठेवला आहे. उद्या सोमवारी विधानसभा अध्यक्ष निवडले जाणार आहेत. त्याआधी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार नसून सत्ताधाऱ्यांकडून  विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं हा एक प्रकारे प्रस्ताव समोर ठेवला आहे. 


कोणकोणत्या नेत्यांनी घेतली भेट


महाविकास आघाडीतील काही महत्त्वाच्या नेत्यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामध्ये भास्कर जाधव, नाना पटोले, विजय वडेट्टीवर हे नेते होते. आज(रविवारी) काही वेळापूर्वी विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज राहुल नार्वेकर यांनी भरला. तर महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरला जाणार नसल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीमध्ये दोन महत्त्वाचे प्रस्ताव महाविकास आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती समोर मांडले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीला मिळावे, महाविकास आघाडीची प्रीपोल अलाईन्स होती. त्यामुळे या सर्वांचा विचार करून संख्या 48 आहे याचा विचार करून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे महाविकास आघाडीला मिळावं असा प्रस्ताव समोर ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्ष पद सुद्धा महाविकास आघाडीला मिळावे हा दुसरा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर महाविकास आघाडीने ठेवला आहे.


भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळण्याबाबत विश्वास 


भास्कर जाधव यांच्यासह पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे यासाठी महाविकास आघाडी एकत्रित मिळून प्रयत्न करेल. विधानसभा अध्यक्ष निवडल्यानंतर तातडीने आम्ही प्रयत्न करू. आम्हाला विश्वास आहे की, आम्हाला विरोधी पक्ष नेते पद दिले जाईल, असंही ते म्हणालेत.


महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव


महाविकास आघाडीने दिलेल्या प्रस्तावाबाबत सत्ताधारी सकारात्मक असून याबाबत पूर्णपणे विचार करून या संदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आला आहे. उद्या विधानसभा अध्यक्ष पदाची नेमणूक झाल्यानंतर तशा प्रकारचं विरोधी पक्ष नेते पद मिळावं यासाठी पत्र विधानसभा अध्यक्षांना देतील आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया विधानसभा अध्यक्षांकडून केले जाईल, त्याबाबतचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतात अशी माहिती आहे. तर विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज महाविकास आघाडी भरणार नाही. पण विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्ष पदाची मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी अर्ज भरणार नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीने पूर्ण विचार केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार की नाही याबाबत चर्चा महाविकास आघाडीने केली, आणि आपण विधानसभा अध्यक्ष पदाचा फॉर्म भरणार नसल्याचा त्यांनी सांगितलं. मात्र, दुसरीकडे महायुतीकडून राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा फॉर्म भरला आहे. जवळपास त्यांचं नाव निश्चित झाला आहे. त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे दिसून येते. मात्र, महाविकास आघाडीने आपण विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरणार नसलो तरी आपल्याला विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्ष पद देण्यात यावं असा प्रस्ताव समोर ठेवला आहे, उद्या सोमवारी विधानसभा अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर यासंबंधीचे पत्र महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्ष यांना देईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे.