Sushma Andhare on Jaykumar Gore  : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांच्यात मागील काही दिवसापासून शाब्दिक वाद रंगल्याच चित्र पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेत जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी या आरोपवार उत्तर देताना सुषमा अंधारे यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा सुषमा अंधारे यांनी गोरेंवर तोफ डागली आहे.  जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, पत्रकार परिषद घेताना कमी पीत चला अश्या शेलक्या शब्दात अंधारेंनी गोरेंवर टीका केली आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर केलेल्या टीकेमुळं राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

Sushma Andhare : संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच 

जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत. संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे. पत्रकार परिषद घेताना थोडी कमी पीत चला, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. सुषमा अंधारे यांनी जयकुमार गोरेविरोधात फेसबुकवर पोट लिहिली आहे. यामाध्यमातून त्यांनी गोरेंवर टीका केलीय. त्यामध्ये ‘एखाद्याच्या पत्रकार परिषदेला उत्तर द्यायचं असेल तर आधी त्याने घेतलेली पत्रकार परिषद पूर्ण बघत चला. तुमच्यासाठी लिंगपिसाट शब्द संपूर्ण पत्रकार परिषदेत कुठेही वापरलेला नाही. पण तुम्हाला स्वतःला जर त्याबद्दल इतकी खात्री वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे असं सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

तुमच्यासारख्या माणसाकडून दुसरी काहीच अपेक्षा असू शकत नाही

तुमच्या आजूबाजूला बसलेले तुमचे जे दोन चमचे वजा दलाल आहेत ना कदाचित त्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग केलेलं आहे. आता तुमच्या दुसऱ्या वाक्याकडे येऊ, तुमच्या बोलण्याचं मला फार विशेष असं वाटलं नाही. भाजपचा  मंत्री म्हटल्यावर ही भाषा फारच सहज स्वाभाविक आहे. कारण तुमच्यासारख्या माणसाकडून दुसरी काहीच अपेक्षा असू शकत नाही. फक्त एकच छोटासा प्रश्न, काल तुम्ही माझा उल्लेख ज्येष्ठ भगिनी असा केलात. आणि आज तुमच्या तोंडी असे शब्द आहेत. जयकुमार तुमच्याकडे मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलतात का.? असा सवाल यावेळी अंधारेंनी केला आहे. 

Continues below advertisement