सांगली - लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभेतल्या निवडणुकांमध्ये (Election) पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या माजी खासदार संजय काका पाटील यांना तासगाव नगर परिषदेत यश मिळाले. त्यामुळे, अखेर दोन पराभवाच्या नंतर संजय पाटील यांच्या अंगावर निवडणूक निकालाच्या निमित्ताने गुलाल उधळला गेलाय. येथील नगरपालिकेतील आर.आर. आबांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांच्या आघाडीचा पराभव झाला आहे. त्यानंतर, संजय काका पाटील (Sanjay kaka patil) यांनी जनतेचे आभार मानले. तसेच, वाघाचं पिल्लू सर्कसवाल्यांच्या ताब्यात जाऊ देण्यापेक्षा जनतेनं पुन्हा सांभाळलं आहे. पोस्टर बॉयचा आता खऱ्या अर्थाने पंचनामा सुरू करतो, असे संजय पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.
संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडी तासगाव नगर परिषदेवर आपली सत्ता मिळवली आहे. विजयानंतर संजय काकांनी विरोधी गट असलेल्या आमदार रोहित पाटील गटावर टीका केली. तासगावातील पोस्टर बॉईज चा पंचनामा सुरू करणार, असा इशाराच संजय काका पाटील यांनी तासगावातील विजय रॅली दरम्यान आमदार रोहित पाटील यांचे नाव न घेता दिला. काकांना संपवण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र, जनतेने हे काय होऊ दिलं नाही, असेही संजय पाटील यांनी म्हटले.
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवाराचा पराभव
सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया बाबासो पाटील विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी, अजितदादा गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. या नगरपालिकेमध्ये एकूण 24 जागांसाठी आज मतमोजणी झाली. त्यामध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे 13 तर आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत.
सांगली जिल्हा
एकूण जागा : 8 (6 नगरपरिषद 2 नगरपंचायत)
शरद पवार राष्ट्रवादी : 2 उरूण ईश्वरपूर नगरपरिषद, आष्टा नगरपरिषद (आष्टा शहर विकास आघाडी)शिवसेना शिंदे : 2 विटा नगरपरिषद, शिराळा नगरपंचायतभाजप : 2 आटपाडी नगरपंचायत, जत नगरपरिषद, काँग्रेस : 1 पलूस नगरपरिषदमाजी खासदार संजय काका पाटील यांची स्वाभिमान विकासा आघाडी: 1 तासगाव नगरपरिषद
शिवसेना UBT- 0अजित पवार राष्ट्रवादी SP- 0मनसे - 0
हेही वाचा
मोठी बातमी! नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव; लोकांनी घराणेशाहीला नाकारले