Sushma Andhare on Raj Thackeray : "तुम्हाला जर विचारायचे असेल की, राज ठाकरे तिकडे का गेले? तर त्यांच्याकडून एक कारण आहे. यांच्याकडून एक कारण आहे. राज ठाकरेंकडून एक उत्तर आहे की, उद्धव ठाकरे जिथे कुठे असतील, त्याच्या विरोधी बाकावर मी असेन, असं सुषमा अंधारे यांनी नमूद केलं", असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या. 'एबीपी माझ्या'च्या तोंडी परिक्षेत सुषमा अंधारे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्या बोलत होत्या. 


तर त्याच्या विरोधी बाकावर मी असेन


सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, तुम्हाला जर विचारायचे असेल की, राज ठाकरे तिकडे का गेले? तर त्यांच्याकडून एक कारण आहे. यांच्याकडून एक कारण आहे. राज ठाकरेंकडून एक उत्तर आहे की, उद्धव ठाकरे जिथे कुठे असतील, त्याच्या विरोधी बाकावर मी असेनचल रे भोपळ्या टुणूक टुणूक, जे लोक व्हाया सुरत, गुवाहाटी गेली. तिथे काही संदर्भ बसतो. तो संदर्भ चपखल बसायला कारण आहे ती, शहाजी पाटलांची व्हायरल झालेली क्लीप आहे, असं अंधारे यांनी नमूदं केलं. 


मी त्यांना बिल फाडण्यासाठी नवीन मिळाली आहे


पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, जे जेव्हा एखादा पुरुष नेता जातो तेव्हा तो संजय राऊत साहेबांवर बिल फाडतो. युवा सेनेतील कोणी तिकडे गेला तर तो वरुण भैय्यांवर बिल फाडतो. जर आणि कोणी जाणार असेल महिला किंवा कोणी तर मग मी त्यांना बिल फाडण्यासाठी नवीन मिळाली आहे, असं अंधारे यांनी सांगितलं. 


अर्जुन खोतकर यांच्याबद्दल आमच्याकडे खरच चर्चा होते


पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, मला वायकर म्हणजे सर्वांत लॉयल वाटायचे. अर्जुन खोतकर यांच्याबद्दल आमच्याकडे खरच चर्चा होते. चर्चा एक दोनवेळेस झालीही आहे. चांगला माणूस आहे पण अडचणीत आला. किमान जाताना त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. माझी अडचण आहे म्हणून मी जातोय. भरत गोगावलेंना स्वत: फोन केला पाहिजे. काहीही असो बिचारा आहे. मला त्यांच्या कोटाबद्दल अप्रुप वाटतं. काय करायचं सर त्या कोटाचं कुठे विकायचा त्यांचा कोट असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Anil Deshmukh on Devendra Fadnavis : 'तू आरोप कर मी क्लीन चीट देतो आणि पदही कायम ठेवतो, असं फडणवीसांनी परमवीर सिंहांना सांगितलं होतं'