Susham Andhare Vs Jyoti Waghmare: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये ड्रग्जचा साठा सापडल्याचा सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांचा आरोप धादांत खोटा आहे. प्रकाश शिंदे (Prakash Shinde) यांनी हे रिसॉर्ट आपण भाड्याने चालवायला दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तरीही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बदनाम करण्यासाठी सुषमा अंधारे या चिखलफेक करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला भीक घालणार नाही. 'बदनामी करने का हक है तुम्हे, क्योकि बराबरी करने की औकाद नही है तुम्हारी', एवढेच मला सांगायचे आहे. एकनाथ शिंदे आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहून तुमच्या पोटात दुखत आहे, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली. त्या गुरुवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Maharashtra Politics news)

Continues below advertisement

यावेळी ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले. बीडचा ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे आणि सुषमा अंधारे यांच्यात काय संबंध आहेत, याचे स्पष्टीकरण आपण द्यावे. रत्नाकर शिंदे याच्या कला केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला, त्यामध्ये मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलींना अवैध व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. सुषमा अंधारे यांच्या पुढाकाराने रत्नाकर शिंदे याचा ठाकरे गटात प्रवेश झाला होता. त्याच्यावर इतके गंभीर आरोप होऊनही तो जामिनावर बाहेर आला. तेव्हा कुंटणखाना चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेला पुन्हा जिल्हाप्रमुख करण्यासाठी कोणी शिफारस केली होती, याचे उत्तर सुषमा अंधारे यांनी द्यावे, असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले. 

अंजली दमानिया यांनी कला केंद्रावर टाकण्या आलेल्या पोलीस छाप्याबाबतचा एक स्क्रीनशॉट मध्यंतरी शेअर केला होता. त्यामध्ये असलेल्या आरोपींची नावे ही सत्वशीला बाबासाहेब अंधारे, आदित्य अंधारे, मयूर अंधारे अशी होती. या सगळ्यांच सुषमा अंधारे यांच्याशी काय कनेक्शन आहे? बीडच्या या कला केंद्रात नाचणाऱ्या अनेक मुलींची आडनावं अंधारे आहेत. त्यामुळे या कला केंद्राच्या छमछमशी तुमचा काय संबंध आहे? तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे रत्नाकर शिंदेची शिफारस का करता, असा सवाल ज्योती वाघमारे यांनी विचारला.

Continues below advertisement

Sushma Andhare news: ज्योती वाघमारेंकडून सुषमा अंधारेंचा शूर्पणखा म्हणून उल्लेख, वाद पेटणार?

ज्योती वाघमारे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले की, कालपासून एका शूर्पणखेने जो गोंधळ माजवला आहे. रामायणातही राम आणि लक्ष्मणावर शूर्पणखेने खोटे आरोप केले. त्याप्रमाणे सुषमा अंधारे यांनी कॅमेऱ्याचा फोकस स्वत:वर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर धादांत खोटे आरोप केले आहेत. शाकाहारी लोक भाजीपाल्यावर जगतात, मांसाहारी लोक इतर काही खातात पण कॅमेराजीवी लोकांना दोन-तीन दिवस कॅमेऱ्यावर ते दिसले नाही की, ते काहीतरी फालतू आरोप करतात. सुषमा अंधारे यांनी निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्यावर आरोप केले आहेत. 

धाड सावरी गावात पडली, पत्रा शेडमध्ये ड्रग्ज सापडले. तिकडे रिसॉर्ट आहे, रिसॉर्टचा आणि पत्रा शेडचा संबंध नाही. ती जागा गोविंद शिरकर यांच्या मालकीची होती, ओंकार डिगे याठिकाणी काम करत होता. ड्रग्ज पत्रा शेडमध्ये सापडले होते. रिसॉर्ट आणि पत्रा शेडचा संबंध नाही, हे सुषमा अंधारे यांनीच सांगितले होते, याकडे ज्योती वाघमारे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा

145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप, प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, आता सुषमा अंधारेंनी मोबाईवरून पुरावेच दाखवले, म्हणाल्या, ते हॉटेल...