मुंबई : भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर तिखट टीका केली. "100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र (Maharashtra) तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांना आवडणार नाहीच" असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला. 


चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?


राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना ₹100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, कारण...


ससून प्रकरणात 9 पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला ते आवडले नसेल कारण... 


हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण... 


कारण, तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री..  तुम्हाला हवे काय ?


 आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय? की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना सेवेत घेणारा गृहमंत्री? तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र करणार तरी काय महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई? - 


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या? 


 अजितदादा (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास त्याचा आनंदच असेल, त्यांना पहिला हार मी घालणार. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) यांनी ही संधी मला द्यावी अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली होती. इतकंच नाही तर अजित पवारांनी राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रिपद देऊ नये, असंही म्हटलं होतं. त्याला आता चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं. 


फडणवीसांचा राजीनामा मागून थकलो 


सुप्रिया सुळे यांनी ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटसंदर्भातदेखील देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अजून काय बोलायचे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणत्या अपेक्षा करणार आहोत? त्यांचा आम्ही अनेकदा राजीनामा मागितला आहे. नको ते काम करण्यात राज्याचे गृहमंत्री व्यस्त आहे, असा आरोपही सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर केला.


संबंधित बातम्या 


Supriya Sule : अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालणार, फडणवीसांनी ही संधी द्यावी; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?