Pune News: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde Resignation) यांनी राजीनामा दिलाया. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलंय. पण धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) त्यांच्या ट्विट मध्ये नैतिकतेमधील 'न' चा ही उल्लेख केलेला नाही. हा किती मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय, अन् दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलंय. यातून मोठा विरोधाभास दिसतोय. हे खूप भयानक असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडे आणि नैतिकता याचा दुरान्वये संबंध येत नाही- सुप्रिया सुळे
जी चार्जशीट बाहेर आली. त्यातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला? सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सिडीआर समोर आणलेले आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झालाय, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? 84 दिवस याकडे कानाडोळा केला. आता काय म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला. पण ज्यांनी राजीनामा दिले ते वैद्यकीय कारणाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं. अहो राज्याला किती फसवणार? सगळं राज्य हताश झालंय. सुरेश धस म्हणतात ते सत्य आहे. धनंजय मुंडे आणि नैतिकता याचा दुरान्वये संबंध येत नाही. ते आज मुंडेंच्या ट्विट वरून स्पष्ट होतो. असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ही काय चेष्टा लावली आहे का?
नैतिकता की वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला, हे आधी स्पष्ट करा. ही माणसं नाहीत, हैवान आहेत. फोटो पाहून राज्य हळहळतोय. बीड हे सुसंस्कृत शहर आहे, तिथं हे हैवान आहेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांना हा नैतिकतेने निर्णय घ्यावा, असं वाटलं असेल. मी विरोधात आहे, म्हणून विरोध करणार नाही. मी त्याचे स्वागत करेन. मी या दोन्ही नेत्यांचा आदर करते, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. पण मुंडे म्हणतात वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला. ही काय चेष्टा लावली आहे का? याचं उत्तर त्यांनी द्याव. सर्व नेत्यांनी जे आरोप केलेत याची पारदर्शक तपासणी व्हायला हवी. संतोष देशमुखांच्या हत्येत ज्या कोणाचा हात असेल त्या प्रत्येकाला चौकात फाशी द्यायला हवी. अशी आग्रही मागणी करत खासदार सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा