Supriya Sule on Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत असे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले. ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत, याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते असेही सुळे म्हणाल्या. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी असे सुळे म्हणाल्या.
नाराज असलेल्यांची समजूत काढू
हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचे सुळे म्हणाल्या. मात्र, त्यांना उमेदवारी दिल्यामुळं जे नाराज आहेत, त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करु असेही सुळे म्हणाल्या. अजित पवारांच्या पक्षाने बारामतीतून कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. मात्र आमच्या पक्षांमध्ये सक्षम उमेदवार आहे. फक्त बारामतीतच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत. आपल्या भारतात टॅलेंटला कमी नाही. संपूर्ण भारतात टॅलेंट आहे, कुणीही अति आत्मविश्वासात राहू नये असेही सुळे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलांवरती सातत्याने अत्याचार होत आहेत हे गृहमंत्र्यांचा अपयश आहे आणि त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा यामध्ये पोलिसांचा दोष नाही तर नेतृत्व अपयशी ठरल्याचे सुळे म्हणाल्या.
हर्षवर्धन पाटील यांनी केली मोठी घोषणा
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी मागणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय गेतला आहे. मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याचे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश