Harshvardhan Patil : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. 


दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी मागणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय गेतला आहे. मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याचे पाटील म्हणाले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो असे पाटील म्हणाले. 


शरद पवार हर्षवर्धन पाटलांना नेमकं काय म्हणाले?


दरम्यान, काल हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमकं काय घडलं? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, काल सिल्व्हर ओकवर शरद पवारांशी बैठक झाली. पवारांनी  काल विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.  जनतेचा आग्रह  असेल तर तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर बाकीची जबाबदारी माझी राहील असे शरद पवार म्हणाल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. मग आपण प्रवेश करायचा की नाही? हे माझ्या इंदापूरच्या जनतेने ठरवावे. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत. इंदापुरात कोणाच्या स्वार्थासठी निर्णय होत नाहीत असेही पाटील म्हणाले. जनतेच्या ज्या भावना आहेत त्यांच्या भावना जाणून निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. आपला निर्णय झाल्यावर ज्या पक्षातले नेते पुढची भूमिका जाहीर करतील. तो अधिकार आपला नाही. पक्षातील नेते योग्य निर्णय गेतली असेही पाटील म्हणाले. 


 



महत्वाच्या बातम्या:


शरद पवार म्हणाले, इंदापूरकरांचा आग्रह असेल तर निर्णय घ्या, पुढचं मी बघतो, तुतारी हाती घेण्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचे 6 मोठे मुद्दे