मुंबई : 'नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत.  पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आहे का हा नेहमीच प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडत असतो. आता आज सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे. माझी लढाई अजित पवार गटांसोबत नाही, असे सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चंना उधाण आले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  अजित पवार गटाच्या  संपर्कात असल्याचा  दावा केला. या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाई फक्त भाजपाविरोधात आहे.  शिंदे गट किंवा अजित पवार गटांसोबत नाही. सुनेत्रा पवार यांचे लागलेले बॅनर मी नाही पाहिले नाही. 


ड्रग्ज विरोधात सरकारने ठोस पाऊले उचलावी : सुप्रिया सुळे 


ललित पाटील प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ड्रग्जच्या बाबतीत कोणही राजकराण करू नये. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी ड्रग्जचे भंडाफोड देशासमोर केली पाहिजे. ड्रग्ज विरोधात सरकारने कडक कारावाई केली पाहिजे .गृहमंत्री कडक कारवाई करणार  असतील तर आम्ही स्वागत करु. या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.


भाजपच्या आयटीसेलने पवारांच्या वक्तव्याची तोडमोड केली


 शरद पवार  एका  कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आहे. याविषयी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोणीही पवार साहेबांचे वक्तव्य नीट वाचलेले नाही. भाजपच्या आयटीसेलने पवारांचे स्टेटमेंटची तोडमोड केली  आहे. भाजपचे आयटी सेल ॲक्टिव्ह झाले आहे. 


हे ही वाचा:


जयंत पाटील अजित पवार गटाच्या  संपर्कात, धर्मरावबाबा आत्राम यांचा खळबळजनक दावा