Supreme Court Maharashtra Local Body Election 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची (Maharashtra Local Body Election 2025) मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. राज्यात सध्या 246 नगरपालिका,42 नगरपंचायतींच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 247 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती अशा 288 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये होत असलेल्या निवडणुकांवर स्थगिती देण्यास नकार दिला होता.  

Continues below advertisement

राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाना सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका (Supreme Court Maharashtra Local Body Election 2025) दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आता निवडणूक आयोगाने माहिती सादर केली आहे.

25 नोव्हेंबरच्या सुनावणीत काय काय घडलं? (Supreme Court Maharashtra Local Body Election 2025)

याचिकाकर्ता- बांठिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितमध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं..तेव्हाचा कायदा म्हणजे खानविलकर यांच्या खंडपीठाने दिलेले निकालपत्र ..ज्यात आरक्षणच नव्हतं.तुषार मेहता ( सॉलिसिटर जनरल ) - कोर्टाला ठरवू देतुषार मेहता - आम्ही सद् हेतूने कोर्टाच्या आदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही अजून माहिती घेतो आहे. पण एक दिवसनंतर सुनावणीला ठेवता येईल का ?..नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुका आहेत. 2 डिसेंबर ..246 परिषद , 42 नगर पंचायत निवडणुका आहेत ..जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका बाकी आहेत

Continues below advertisement

इंदिरा जयसिंग (याचिकाकर्ता)- आधीच निवडणुका जाहीर आहेत. अर्ज भरून झाले आहेत.

याचिकाकर्ता- 40 टक्के नगरपरिषदेत पन्नास टक्के आरक्षण उल्लंघन झाले आहेत.

सरन्यायाधीश सूर्यकांत- आज आम्ही कोणतेही मत मांडत नाही. 

तुषार मेहता- गुरूवारी किंवा शुक्रवारी ठेवूया.

निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवून मागितला. त्यावर याचिकाकर्त्यांने जोरदार आक्षेप घेतला. याचिकाकर्ता- 50 टक्के आरक्षण उल्लंघन झाले आहे. सरन्यायाधीश- शेवटी या प्रकरणातील आदेशाला बांधील असूनच निवडणूक होणार आहेत. आयोग- आज तुम्ही निर्णय केलात तर त्यानुसार आम्हाला आरक्षण वर्गवारी करावी लागेल.शुक्रवारी याच वेळेला 12 वाजता

सरन्यायाधीश सूर्यकांत - शुक्रवारी पुढील सुनावणी

काय आहे नेमका वाद? (Maharashtra Local Body Election 2025)

विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र असा की, बांठिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीने करण्यात आली आहे, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

50% आरक्षण मर्यादा किती ठिकाणी ओलांडली जात आहे? (Nagarpanchayat-Nagarparishad Election 2025)

जिल्हा परिषद - 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये पंचायत समिती- 336 पैकी 83 पंचायत समित्यांमध्ये नगरपालिका- 242 पैकी 40 नगरपालिका क्षेत्रात नगर पंचायत- 46 पैकी 17 नगरपंचायतींमध्ये महापालिका- 29 पैकी 2 महापालिका क्षेत्रात

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: