Sujay Vikhe Patil: भाजपचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी पुन्हा एकदा शिर्डीतील (Shirdi) साईबाबांच्या प्रसादाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. लापशी आणि घुगऱ्या म्हणजे प्रसाद असतो. हा कुठला प्रसाद? यात पोळी, भात, वरण, मिठाई आहे. हे जेवण आहे. हा प्रसाद नाही, असे त्यांनी पालिका प्रचार सभेदरम्यान म्हटले आहे. शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांड आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर याआधी त्यांनी “अनेक जण साई भक्त म्हणून फिरतात. रात्री दारू पिऊन जेवतात आणि सकाळी पुन्हा भक्त म्हणून फिरतात,” असे म्हटल्याने त्यांच्या वक्तव्यावर मोठी टीका झाली होती. त्या वेळीही विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. आता विखेंच्या आणखी एका वक्तव्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sujay Vikhe Patil: नेमकं काय म्हणाले सुजय विखे?
सुजय विखे म्हणाले की, एमआयडीसीमुळे रोजगार निर्मिती होईल. आपला हॉटेल व्यवसाय चालण्यासाठी मी आवाज उठवणार की, हे प्रसादालय बंद करा. सगळ्यांनी माझ्यावर टीका केली. म्हणे हा प्रसाद आहे. अरे प्रसाद काय असतो? प्रसाद घुगऱ्या आणि लापशी असते. हा कुठला प्रसाद? त्यामध्ये पोळी, भात, मिठाई, वरण, डाळ आहे. हे जेवण झाले, हा प्रसाद नाही. साई भक्तांनी येऊन प्रसाद घ्यावा, याला आमचा विरोध नाही. पण, रात्री दारू पिऊन लोक प्रसाद खायला जातात, जेवढे साईभक्त म्हणून फिरत होते ते साईभक्त नव्हते. भिकारी, गुन्हेगार होते. जेवायचं, झोपायचं परत सकाळी आपल्या कामाला लागायचं. हे बंद होणार, हे बंद झालं पाहिजे. मी आवाज उठवल्यानंतर टीका झाली. पण, मला विश्वास होता की, शिर्डी माझ्या पाठीमागे उभी आहे. जेव्हा मर्डर झाले तेव्हा लोक म्हणाले की, सुजय विखे खरं बोलत होते, असे त्यांनी म्हटले आहे.
Sujay Vikhe Patil: सुजय विखेंनी याआधीही केलंय वादग्रस्त वक्तव्य
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे आणि मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी ते पैसे वापरावेत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे यांनी केली होती. मात्र ही मागणी करताना सुजय विखे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. शिर्डी संस्थानच्या प्रसादालयात मोफत जेवण बंद करा, राज्यातील सगळे भिकारी मोफत जेवण्यासाठी शिर्डीत गोळा झालेत असं त्यांनी म्हटलं होतं. सुजय विखेंच्या या वक्तव्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती.
आणखी वाचा