Sujay Vikhe on Balasaheb Thorat Satyajeet Tambe: संगमनेर नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ (Suvarna Khatal) यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची संगमनेरमध्ये (Sangamner) जाहीर सभा पार पडली. या सभेतून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Continues below advertisement

सुजय विखे म्हणाले की, ही माझी आवडती जागा आहे. इथे आल्यावर माझे व्हायब्रेशन सुरू होते. इथे आल्यावर माझ्या अंगात येतं. विधानसभेला आपण परिवर्तन केले, तसे पालिकेत परिवर्तन करायचे आहे. इतके दिवस मी आलो नाही तर बऱ्याच चर्चा सुरू होत्या. इथे सेवा समिती आघाडी नाही तर मेवा समिती आघाडी आहे. मामा भांजे कर्मचारी, फौज तो तेरी सारी है, स्टेजपर बैठे 31 अभी भी तुमपे भारी है, असे त्यांनी म्हटले. 

Sujay Vikhe : अमोल खताळची बिल्डिंग सुजय विखे पडू देणार नाही

सुजय विखे पुढे म्हणाले की, आपण टेस्ट खेळत नाही. ट्वेंटी ट्वेंटी खेळतो. मला संगमनेरात एक बोर्ड दिसला त्यावर सिंह होता. संगमनेरमध्ये बिबटे, डुकरं, मोकाट कुत्रे पाहिले. आता सिंह पण पाहिला. टायगरला रोखण्यासाठी सिंह आणला. पण वाघ आणि सिंहाच्या लढाईत वाघच जिंकतो. सुजय विखेला मॅनेज करणारा या धर्तीवर जन्माला यायचा आहे. मी सुजय विखे आहे. रोज रात्री सारखा कपिल शर्मा शो नाही. अमोल खताळ बिल्डिंग असेल तर सुजय विखे त्या बिल्डिंगचे फाऊंडेशन आहे. अमोल खताळची बिल्डिंग सुजय विखे पडू देणार नाही. मी शांत बसलो होतो. मात्र नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव सगळीकडे लोक आमच्या मागे लागले. या लोकांचा 40 वर्षांचा स्वर्ग म्हणजे कचऱ्याचा डोंगर, गटारी, डुकरं आहेत, असे देखील त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

Sujay Vikhe : संगमनेरचा चेहरा मोहरा बदलणार

आमचे 31 उमेदवार फक्त चेहरे, मात्र त्यामागे दडलेला संगमनेरचा विकास आहे. एका वर्षात आम्ही संगमनेरचा चेहरा बदलला, आणखी चार वर्षे बाकी आहेत. पालिकेत सत्ता द्या, संगमनेरचा चेहरा मोहरा बदलणार. संगमनेर 2.0 म्हणतात. मग आधी काय होते? मला व्यक्तिगत आरोप आणि चिखलफेक करायची नाही. व्यक्तिगत आरोपाने विकास होत नाही. आपल्याला शांत राहून पालिकेत सत्ता आणायची आहे, असे सुजय विखे म्हणाले. 

आणखी वाचा 

Disha Salian Case : पाच वर्ष उलटून गेलीत, किती काळ तपास करणार? उच्च न्यायालयाकडून दिशा सालियान प्रकरणी मुंबई पोलिसांची खरडपट्टी