Suhas Palshikar on Majha Katta : "भाजप मागील निवडणूकीप्रमाणे या निवडणुकीतही तेवढ्याच बहुमताने निवडून येईल, असं म्हणून सर्वांनी दुर्लक्ष केलं. पण पाहाता पाहाता पीएम मोदींना विरोधी पक्ष काय म्हणतात? या गोष्टींना उत्तर देण्याची वेळ आली. त्यामुळे भाजप एकप्रकारे बचावात्मक भूमिकेत आहे आणि इतर पक्ष आक्रमक भूमिकेत गेले, असं चित्र निर्माण झालं. 10 वर्षातील एकपक्षीय वर्चस्वाच्या अनुभवानंतर या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे ", असे राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर (Suhas Palshikar) म्हणाले. ते 'माझा कट्टा'वर बोलत होते. 


मोदींचा चेहरा पाहतील की उमेदवाराचा?


सुहास पळशीकर (Suhas Palshikar) म्हणाले, 370 कलम राजकारणात महत्वाचा मुद्दा राहिलेला नाही. तो भावनिक मुद्दा होता आणि कोणताही पक्ष म्हणत नाही की, 370 कलम आम्ही परत आणणार आहोत. राम मंदिराचा मुद्दा अप्रत्यक्षपणे राजकारणात आहे. राम मंदिराच्या मुद्याबाबत भाजपला यश आलंय. निम्मे लोक पक्ष पाहून उमेदवार पाहून मतदान करतात तर निम्मे लोक पक्ष पाहून मतदान करतात. भाजपकडे 2019 मध्ये 37 टक्के मतदार होते. आता मोदींमुळे काही मतदार आकर्षित झाला तर तिनातील एक मतदार त्यांच्या बाजूने आहे. या निवडणुकीत आपला मतदार राखणे हे भाजपसमोरचे आव्हान असणार आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये त्यांनी त्यांची मतं वाढवलेली आहेत. आता दक्षिणेतील राज्यात त्यांना मत वाढवायची आहेत. 


निवडणूक आयागाने लोकशाहीचे संकेत मोडले 


पुढे बोलताना सुहाश पळशीकर (Suhas Palshikar) म्हणाले, कोणत्याही निवडणूकीत चिन्ह महत्वाचे असते. चिन्ह हे राजकीय पक्षाच्या आयडेंटीटीचा भाग बनतं, म्हणून ते महत्वाचं असतं. ज्या चिन्हाबाबत वाद होईल, ते चिन्ह गोठवलं पाहिजे होतं. हे हेल्दी लोकशाहीचा संकेत आहे. तो यापूर्वी निवडणूक आयागाने संकेत मोडले आहेत. पण यावेळी निवडणूक आयोगाने हा संकेत थेटपणे मोडला. मागच्या निवडणूक निकालाच्या आधारे चिन्ह देऊन टाकणे हे फेअर पॉलिटिक्समध्ये बसत नाही. ज्या यंत्रणेकडे फ्री अँड फेअर निवडणूका घेण्याची जबाबदारी आहे, त्या यंत्रणेने असे निर्णय घेणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात खूप गोंधळ झालेले असू शकतात.  वीटभट्टीवर काम करणाऱ्या लोकांना पक्षफुटी आणि बदलेल्या चिन्हाबाबत माहिती पोहोचतेच असं नाही. पोहोचू शकते पण त्याचं जीवन अशाप्रकारचे आहे की ते समजून घेऊन निर्णय घेणे अवघड असते. अशा वेळेला अन्याय्य निर्णय घेणे चुकीचे आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Suhas Palshikar : महाराष्ट्राची हवा कुणाच्या बाजूने? देशात कुणाची सत्ता? राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांचे 'माझा कट्टा'वर बेधडक विश्लेषण