Election Commission seizures : लोकसभा निवडणुकीदरम्यान पाचव्या टप्प्यापर्यंत निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने जवळपास 8 हजार 889 कोटींचे घबाड जप्त केले आहे. यामध्ये रोकडीसह अवैध वस्तूंचा समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतची माहिती जाहिर करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एवढी मालमत्ता जप्त करण्यात आल्याने निवडणूका खरच स्वच्छ वातावरणात पार पडत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे निवडणूक आयोगाने जप्तीची तलवार उपसली आहे. 






लवकरच 9 हजार कोटींचा टप्पा पार करणार 


निवडणूक आयोगाच्या मते हा आकडा लवकरच 9 हजार कोटींचा टप्पा पार करणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात पार पडव्यात यासाठी विविध संस्थांनी आत्ताप्रर्यंत 8 हजार 889 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या तीन टप्प्यांतील प्रचार जोमात सुरु आहे. प्रलोभनेद्वारे मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाने सीईओंना निर्देश दिले आहेत. 


3958 कोटी रुपयांची मालमत्ता ड्रग्जसंबंधीची


एकूण जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये 45 टक्के हिस्सा ड्रग्जच्या रुपाने जप्त करण्यात आलाय. निवडणूक आयोगाने 8 हजार 889 कोटींचे घबाड जप्त केले, त्यापैकी 3958 कोटी रुपयांची मालमत्ता ड्रग्जसंबंधीची आहे.  निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सातत्याने पाठपुरावा, जिल्ह्यांचा सातत्यपूर्ण आढावा आणि यंत्रणांच्या दक्षतेमुळे 1 मार्चपासून आतापर्यंत एवढी मोठी रक्कम जप्त केली. जेणेकरून लोकसभा निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात. पैशाचा किंवा बळाचा वापर होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली.  






 


इतर महत्वाच्या बातम्या


Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : धनंजय मुंडे जातीवाद करु लागलेत, पोस्ट टाकायला लावतेत, त्यांचे कार्यकर्ते मला मारीन म्हणतेत, मनोज जरांगेंचे गंभीर आरोप