जालना: मराठा आरक्षण आंदोलक(Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) सातत्यानं चर्चेत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या  दिवशी उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलेली आहे. एकीकडे भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात हल्लाबोल केलेला असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. 


किशोर दराडे मनोज जरांगेंच्या दुसऱ्यांदा भेटीला


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेचे विधानपरिषद आमदार किशोर दराडे यांनी दुसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत आमदार किशोर दराडे यांनी काल रात्री मराठा आंदोलक मनोज जारंगे यांचा सत्कार केला.आमदार किशोर दराडे यांनी दोन आठवड्यापूर्वीच मनोज जरांगे यांची भेट घेतली होती, रात्री दुसऱ्या भेटीत  दोघांमध्ये तासभर चर्चा झाली,त्यांच्या या दुसऱ्या भेटीचं कारण मात्र कळू शकले नाही .


मनोज जरांगे 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगे यांनी  काल माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे हे 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल आहे.


एकीकडे भाजप नेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड उघडपणे मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलत आहेत. दुसरीकडे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.   


राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. ही भेट झाल्याचं वृत्त धनंजय मुंडे यांनी नाकारलं होतं. तर, मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे भेटल्याचं सांगितलं होतं. मनोज जरांगे यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की,मुंडे यांनी  भेट टाळली त्याला मी काय करू शकतो. भेट झाली मी सांगितलं भेट झाली. राज्यातील प्रत्येक गावात मराठा सेवकाची टीम तयार करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं होतं. 
 
दरम्यान, मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आरक्षण आंदोलनासाठी घोंगडी बैठका घेण्यात येतात. 


इतर बातम्या :


भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करतोय, किरीट सोमय्यांचा प्रचार समितीसाठी काम करण्यास नकार, दानवे, बावनकुळेंना लिहिलं पत्र, म्हणाले...


महायुतीत सर्वांनी समान जागा लढवाव्या, मिटतच नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती व्हाव्या, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य