Shivaji Kalge, नांदेड : एस सी प्रवर्गात असूनही ओबीसीतून जात प्रमाणपत्र काढण्याची वेळ आली. मला जंगम बेडा जंगम आणि बुडगा जंगम जातीची प्रमाणपत्र मिळणेच मुश्किल झाले होते. त्या त्रासातून मी ही गेलो आहे. यासाठी लढा उभारणार असल्याचे लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे (Shivaji Kalge) म्हणाले. ते नांदेडमध्ये बोलत होते. 


समाज संख्येने खूप छोटा आहे, यामुळे संघर्ष करू शकत नाही


शिवाजी काळगे म्हणाले, लिंगायत समाजातील काही जाती एस सी प्रवर्गात येतात. मात्र त्यांना जात प्रमाणपत्र काढणे. जात प्रमाणपत्राची वैधता करून घेणे. त्याबाबतचे पुरावे जमा करणे यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांच्यावर ओबीसी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र काढण्याची वेळ आली आहे. समाज संख्येने खूप छोटा आहे, यामुळे संघर्ष करू शकत नाही आणि सरकारचं त्याकडे लक्ष नाही. यासाठी आम्ही लढा उभा करू असे मत लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी व्यक्त केले. ते आज नांदेड येथे एका कार्यक्रमात हजर होते.


पुढे बोलताना काळगे म्हणाले, लिंगायत समाज संख्येने त्याचा खूप मोठा आहे. महाराष्ट्राने कर्नाटकाची सीमारेषेवर समाजाची संख्या मोठी आहे. मात्र लिंगायत समाजात अनेक पोटजाती आहेत. त्यातील काही पोटजातींचा समावेश एससी प्रवर्गात होतोय. जसे मला जंगम ,बेडा जंगम, बुडगा जंगम हा समाज आर्थिक उन्नतीपासून दूर आहे. कोणताही मुख्य व्यवसाय नाही, शेती नाही. उत्पन्नाचे साधन ही तुटपुंज आहेत, अशी अवस्था या समाजाची आहे. एससी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या या जातींची लोकसंख्या ही अत्यल्प आहे.


अडचणी दूर करण्यासाठी येणाऱ्या काळात लढा उभा करण्याचा मानस 


शिक्षणाचा अभावामुळे त्यांना वंशपरंपरागत शेत जमिनीच्या नोंदी ठेवणे माहित नाही. बऱ्याच जणांकडे तर शेतीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पुरावे नाहीत. यासह अनेक कारणामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र काढताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जातीचे प्रमाणपत्र मिळालं तर जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. त्यातच फक्त जंगम असा उल्लेख असलेल्या जातीला ओबीसी मधून समाविष्ट करण्यात आला आहे. ओबीसी प्रमाणपत्र लवकर उपलब्ध होत यामुळे एससी प्रवर्गात असलेले अनेकांनी जंगम अशी जात उल्लेख करत प्रमाणपत्र काढली आहेत. मात्र पुढे चालून त्यांना अडचणी आल्यात. यामुळे माला जंगम ,बेडा जंगम ,बुडगा जंगम जातीची प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी येणाऱ्या काळात लढा उभा करण्याचा मानस लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


पुण्यात महायुतीत मिठाचा खडा, अजितदादांच्या आमदाराविरोधात भाजपने दंड थोपटले