MP Sanjay Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav ) यांनी आज लोकसभेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. जेव्हा रस्ते विकासाचे नाव घेतले जाईल तेव्हा महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी यांचे नाव घ्यावे लागेल असे संजय जाधव म्हणाले. संजय जाधवांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा यावेळी संदर्भ दिला. दरम्यान, यावेळी ठाकरे गटाच्या खासदाराने नितीन गडकरींचे कौतुक केल्यानं हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांचाच खासदार मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान, यावेळी संजय जाधव यांनी पुणे नगर रस्ता मोठा करावा अशी मागणी देखील गडकरी यांच्याकडे केली. त्याचबरोबर तर शक्तिपीठ मार्गाविषयी तुमची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवतो, असे आश्वासन देखील मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.
संजय जाधव यांनी नेमक्या काय केल्या मागण्या?
दरम्यान, यावेळी नितीन गडकरी यांचे कौतुक करताना संजय जाधव यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा संदर्भ दिला. शुद्ध बीजापोटी | फळे रसाळ गोमटी ॥ मुखी अमृताची वाणी | देह वेचावा कारणी असा अभंग म्हणत संजय जाधव यांनी गडकरी यांचे कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या सुपुत्राने रस्त्यांचे काम करुन देशभरात महाराष्ट्राचं नाव केलं आहे. हैदराबाद आणि तिरुपती बालाजीला जाण्यासाठी परभणीवरुन नांदेड नरसी आणि दगलूर हा रस्ता 6 लाईन बनवला तर मराठवाडा आणि विदर्भातीला लोकांना सहज जाण्यासं सोपं होईल असे संजय जाधव म्हणाले. छत्रपती संभाजीनगर ते पुमे आणि पुणे ते परभणी हा रस्ता जर 6 लाईनचा करावा असे संजय जाधव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: