Sanjay Raut : रोहित पवार (Rohit Pawar) हे चुकीच काम करूच शकत नाहीत. रोहित पवारांनी कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाही. याउलट जरंडेश्वर कारखान्याचं काय झालं? ED नं अजित पवारांना क्लिनचीट कशी दिली. रोहित पवारांनी कोणत्याही प्रकारच्या मोगलशाही पुढे न झुकण्याची भूमिका घेतलीय, जी आम्ही देखील घेतलीय, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्राचे लचके तोडण्याचं काम, तसेच महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचं काम सध्या भाजपकडून सुरू आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ले करण्याचं काम सुरू आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची बारामती अॅग्रो संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यावर उबाठा गटाचे संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
रोहित पवार भाजपात गेल्यावरच त्यांच्यावरील कारवाई थांबेल - संजय राऊत
संजय राऊत पुढे म्हणाले, अजित पवारांवरील आरोपांचं काय झालं ते आधी सांगा. जर रोहित पवार यांच्यावरील ED कारवाई थांबवायची असेल, तर त्यांना भाजपात जावं लागेल, पण रोहित पवार कुठेच जाणार नाही, जितक्या कारवाया करायच्या तितक्या करा, हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, आम्ही तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही, दिल्लीतील मुघलशाहीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही. रोहित पवार यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत आहेत त्यांचा छळ केला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा छळ केला जात आहे. त्यांना वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे असा काय गुन्हा केला आहे रोहित पवार यांनी? उद्योग आहे, व्यवहार आहे, लहान सहान गोष्टी मागे-पुढे झाल्या असतील. त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणे आणि बदनाम करणं हे योग्य नाही असं रोहित पवार म्हणाले.
"फडणवीस यांनी सांगावं, रोहित पवार भाजपमध्ये या, आम्ही कारवाया थांबवतो"
राऊत पुढे म्हणाले, इतर सगळे लोक गप्प बसले असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील फडणवीस असतील, पण उद्धव ठाकरे, शरद पवार, रोहित पवार, संजय राऊत असे अनेक लोक आज आहेत, आमच्यावर कारवाया झाल्या होतील आम्ही तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही. फडणवीस यांनी सांगावं, रोहित पवार भाजपमध्ये या आम्ही कारवाया थांबवतो रोहित पवार हे कुठे जाणार नाहीत ते आजोबांबरोबर ठाम राहतील जसे आम्ही आहोत. असं ते म्हणाले
"अजित पवारांनी गुडघे टेकले, आणि भाजपमध्ये पळून गेले"
राऊत पुढे म्हणाले, रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू आहे अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर देखील झाली, मात्र त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली. इकबाल मिरची यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे ईडीने दाखवले ते भाजपमध्ये गेले, आणि कारवाई थांबली. हसन मुश्रीफांचं काय झालं? अशोक चव्हाण आदर्श घोटाळा प्रकरणी कारवाई थांबली. पण आमच्यासारख्या लोकांचे अनिल देशमुख रोहित पवार आणि मी असेल अन्य काही लोक आहेत ते आपल्यापुढे नतमस्तक व्हायला आपल्या पायाशी बसायला तयार नाहीत, कारण आम्ही स्वाभिमानी मराठी आहोत असं ते म्हणाले.
संजय राऊतांचा भाजपला इशारा
पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला आहे, ते म्हणाले, आमच्यासारखे स्वाभिमानी लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे, महाराष्ट्र तोडण्याची मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची, तुमची इच्छा पूर्ण होणार नाही
"पाच जागेचे तुकडे कुत्र्यांपुढे हाडुक फेकावा अशी गत"
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपा संदर्भात संजय राऊत म्हणाले, ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली असे म्हणत आहेत, आज दोन-चार लोकसभेच्या जागांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहे. डुप्लिकेट शिवसेनेचे नशीब हेच आहे. शिवसेना जी आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आम्ही 23 जागा सतत लढत होतो, आणि त्या 23 जागा लढू, पण जे डुप्लिकेट आहेत, त्यांच्या वाटेला पाच जागा येत नाहीत. पाच जागेचे तुकडे कुत्र्यांपुढे हाडुक फेकावा अशी फेकलेल्याची बातमी मी वाचत आहे. अजित पवार दोन चार जागेवरतीच बोळवण करत आहेत. डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये. आम्ही स्वाभिमान होतो आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानाने तुम्ही त्यांची भांडी घासत बसा.
हेही वाचा>>>
मोठी बातमी! शाखा शिवसेनेची आणि उद्घाटन भाजप मंत्र्याकडून, भाजप मंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते शिवसेना शाखेचं उद्घाटन