मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी ( Shiv Sena MLA Disqualification Case) ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची आज पुन्हा एकदा उलट तपासणी होत आहे. सलग तीन दिवस सुनील प्रभूंना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची आहेत. याआधीही उलट तपासणीवेळी व्हिपवरुन खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आजच्या साक्षीवेळी महेश जेठमलानींनी एकना शिंदे यांना सुनील प्रभूंनी पाठवलेल्या पत्रावरुन विचारणा केली. एकनाथ शिंदे यांना कोणत्या भाषेत पत्र पाठलं, कोणत्या माध्यमातून पाठवलं, इंग्रजी पत्र याआधी पाठवलं होतं का, असे प्रश्न सुनील प्रभू यांना विचारण्यात आले. 


महेश जेठमलानी : दिलीप लांडे यांची सही ही अनुक्रमांक 32 समोर आहे का? 


सुरेश प्रभू : - 32 समोर सही केली आहे 


विधान सभाअध्यक्ष :- तुम्ही स्पष्ट उत्तर द्या..तिथं सही आहे मात्र ती लांडेचीच आहे का? असा त्यांचा प्रश्न आहे


सुनील प्रभू -  त्यांच्या नावासमोर सही आहे ती त्यांची असणार ना?


महेश जेठमलानी : प्रतिज्ञा पत्रात 50 व्या परीच्छेदात जे  पत्र तुम्ही जोडेल आहे त्यावर तुमचीच सही आहे का?  


प्रभू - होय 


जेठमलानी - हे पत्र तुम्ही एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलं आहे का? आणि त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत समजावून सांगितला आहे का? 


प्रभू - होय..हे पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशुन आहे. आणि त्याचा मजकूर मला मराठीत समजावून सांगण्यात आला आहे.


जेठमलानी : आपण कथित पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे मग हे इंग्रजीत का लिहिले गेले? 


प्रभू - भविष्यात कायदेशीर बाबीसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून पत्र इंग्रजीत लिहिले आहे


जेठमलानी : मराठीत लिहिलेले पत्र कायदेशीर बाबीसाठी वापरता येत नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे


प्रभू - नाही हे  चुकीचं आहे..मला असं वाटलं म्हणून मी  लिहिलं कदाचीत त्यावेळी मला ज्ञान नव्हतं.आता मला हे पाहिल्यावर कळलं की मराठी देखील पत्र चालतं


प्रभू - भविष्यात कायदेशीर प्रोसिडिंग करायची असेल तर युक्तिवाद इंग्रजीत होईल म्हणून मी हे पत्र इंग्रजीत लिहिले


जेठमलानी - जेव्हा आपल्या कोणत्याही पत्रा संदर्भात कायदेशीर बाबी उद्भवतील असे वाटते तेव्हा आपण इंग्रजी भाषेत पत्र लिहिता, असो म्हणणे योग्य आहे का? 


प्रभू - हे खोटे आहे.


जेठमलानी - आपल्याला या पत्राबाबत असे का वाटलं की कायदेशीर पेच उदभवू शकतो


प्रभू - त्यावेळी राजकीय पेच आणि संभ्रम निर्माण झाला होता त्यातून कायदेशीर पेच भविष्यात निर्माण होतील असे मला वाटले


जेठमलानी - यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया उद्धवू शकते, असे २२ जून २०२२ रोजी प्रथमच आपल्याला वाटले का? 


प्रभू - यापूर्वी विधीमंडळात असे पेच निर्माण झाले त्यावेळी ते ते पेच न्यायालयात गेले व दाद मागितली गेली हा पूर्व इतिहास होता. म्हणून मला हे वाटले बरोबर आहे


जेठमलानी : इंग्रजीत लिहिलेले हे एकमेव पत्र आहे का? 


प्रभू - नाही


जेठमलानी - पत्रातील भाषा आपली आहे का? 


प्रभू - मला त्यावेळी जे वाटले ते मी लिहिलं


जेठमलानी - या पत्रात वापरलेली भाषा आपली स्वतःची आहे का


प्रभू : मराठीत जे आकलन झाले, जे मला वाटलं लिहावेसे, ते मी इंग्रजीत भाषांतर करून लिहिले


जेठमलानी : आपण हे पत्र मराठीत कुणाला सांगितले का?


प्रभू - मला आठवत नाही


जेठमलानी : या पत्राचा मराठी मसुदा आपल्याकडे आहे का? 


प्रभू - आता नाही आहे


जेठमलानी : आपण मेल केला होता तेव्हा मराठी मसुदा तयार केला होता का? 


प्रभू - मला आता आठवत नाही


जेठमलानी - या पत्राच्या अगोदर किंवा नंतर आपण कधी एकनाथ शिंदे यांना इंग्रजीत पत्र लिहिले आहे का? 


प्रभू - होय लिहिलंय


जेठमलानी - आपण एकनाथ शिंदे यांना 21 ते 30 जूनमध्ये इंग्रजीत पत्र लिहिल का?


प्रभू - होय


जेठमलानी - हे सोडून इतर कुठलं लिहिलं का?


प्रभू - होय लिहिलंय


जेठमलानी - आता ते आपण आता सादर करू शकता का? 


प्रभू - रेकॉर्डवर आहे


जेठमलानी - 22 जून 2022 चे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले


प्रभू - वाट्सअपच्या माध्यमातून


जेठमलानी - आपण आता यावेळी वाट्स अप मेसेज सादर करू शकता का? 


प्रभू - आता नाही करू शकत


जेठमलानी - उद्या सादर करु शकता का? 


प्रभू - आता मी नेमकं सांगू शकत नाही बघतो मी प्रयत्न करतो


जेठमलानी -  आपण हा वाट्स संदेश आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला आहे का?


प्रभू - मला नेमकं आठवत नाही..मी हा मेसेज माझ्या मोबाईलवरून पाठवला की कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरून म्हणून म्हटलं प्रयत्न करतो


जेठमलानी - आपण या पत्राची एक प्रत सादर केली आहे.. वाट्स अपवर पाठवलेली प्रत ही मुळ प्रत आहे असे समजायचे का? 


प्रभू - नाही


जेठमलानी - पत्राची मूळ प्रत कुठे आहे


प्रभू - ओरिजिनल प्रत रेकॉर्डवर आहे


जेठमलानी - एकनाथ शिंदे यांना अशी कोणतीही मूळ प्रत पाठवण्यात आलेली नाही असे मी आपल्याला सांगतो


प्रभू - हे खरं नाही


सुनील प्रभू यांचा यू टर्न


दरम्यानलंच नंतर सुनील प्रभू यांनी साक्ष बदलली. एकनाथ शिंदे यांना व्हॉट्सअॅप नव्हे तर मेलवर पत्र पाठवल्याचं प्रबू यांनी सांगितलं. लंच ब्रेकमध्ये मी चेक केले तर ते मेलवर पाठवल्याचे आढळले. त्यामुळे साक्ष बदला अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष यांनी त्यासाठी परवानगी दिली.  महेश जेठमलानी यांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवल्याचे पुरावे मागितले होते.


जेठमलानी - तुम्ही स्वतः हा ईमेल पाठवला ?


प्रभू - मी स्वतः नाही, पार्टी ऑफीसचे जोशी आहेत त्यांना मेल करायला सांगितला.


जेठमलानी - प्रश्न क्रमांक 165 च्या उत्तरात बदल केला आहे. आपण म्हटला की आपण माहिती घेतली आहे. आपण कुणाकडून माहिती घेतली? 


प्रभू - मी माझ्या कार्यालयाकडून माहिती घेतली. 


जेठमलानी - आपण ही माहिती व्यक्तिशः कार्यालयात जाऊन घेतली? की फोनवरून घेतली? 


प्रभू - माझ्यासोबत माझे सहकारी व सहाय्यक होते, त्यांना मी हे विचारले त्यांकडून ही माहिती घेतली. 


जेठमलानी - तुम्ही स्वतः मेल केला होता का? 


प्रभू - मी स्वतः नाही, तर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जोशी आहेत. त्यांना मेल करायला सांगितला होता. 


जेठमलानी - आपण जोशी यांच्याशी कुठे बोलला ?


प्रभू - या इमारतीत बोललो


जेठमलानी - म्हणजे जोशी याठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही त्यांना येथे भेटला? 


प्रभू - खाली कार्यालयात, तळमजल्यावर


जेठमलानी - जोशी या इमारतीत होते आणि तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी बोललात ? 


प्रभू - लंच टाइम मध्ये दानवे यांच्या कार्यालयात तळ मजल्यावर त्यांना बोलावले आणि त्यांना विचारलं.


जेठमलानी - तुम्ही त्यांना नेमका कुठला प्रश्न विचारला ?


प्रभू - मी त्यांना अस विचारलं की एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस मी व्हाट्सअप वर पाठवली अस म्हणालो पण मला आठवत नाहीये आपण त्या दिवशी पाठवलेले मेल पण चेक करा त्यावेळी त्यांना तो मेल आढळला व त्यांनी मला सांगितलं.


जेठमलानी - ज्याअर्थी त्यांना हे ईमेल सापडलेले आहेत, तुम्ही एकाच इमारतीत आहात. तर तुम्ही त्यांना या ईमेलच्या प्रिंट आऊट का सादर करायला सांगितल्या नाहीत. 


प्रभू - मी सांगितले ना तुम्हाला. मी खरं बोललो. मी उद्या तुमच्यासमोर सादर करतो. 


जेठमलानी - आमदारांना पत्र आणि पक्षादेश ईमेल ने पाठविण्याची पद्धत केव्हा पासून सुरू झाली हे तुम्ही सांगाल का?


सुनील प्रभू- मला नाही आठवत


जेठमलानी- ह्या पद्धतीबद्दल तुम्हाला कधी समजले?


सुनील प्रभू -  जेव्हा मी आमदार झालो तेव्हा


 


सुनावणी दरम्यान - जेठमलानी यांनी विचारले प्रभू तुम्ही आमदार कधी झालात?


प्रभू म्हणाले 2014 साली झालो 


लोकसभेच्या तुमचा प्रचार पण केला आहे साहेब ( जेठमलानी यांना संबोधून)


अनिल परब यांनीही तुमचा प्रचार केला आहे 


जेठमलानी- हो मला माहिती आहे, तेव्हा युती होती 


अध्यक्ष (उपहासात्कम) - म्हणून तर सोपे प्रश्न येत नाही ना


सुनावणीदरम्यान एकच हशा



जेठमलानी - तुम्ही पहिल्यांदा आमदार कधी झालात?


सुनील प्रभू - ह्या टर्मच्या आधी झालो


जेठमलानी - या प्रथेबाबत 2014 पासून तुम्हाला माहित होतं तर 22 जूनला एकनाथ शिंदे यांना इंग्रजीतुन पाठवलेल पत्र ईमेल वरून पाठवलं आहे हे तुम्ही तुमच्या अपत्रता याचिकेत का नाही सांगितलं? 


प्रभू - रेकोर्डवर आहे


जेठमलानी - ब्रेकमध्ये तुम्हाला असं का वाटलं की जोशी यांच्याशी तुम्हाला बोलावं ?


प्रभू - ब्रेक आधीचा प्रश्न होता त्यात मी उत्तर देताना म्हणालो की व्हाट्स अॅपवर पत्र पाठविलं होतं. पण नंतर विचार करत असताना खरी बाजू पटलावर यावी म्हणून जोशी यांच्याशी बोलून गोष्टीची शहानिशा करून सत्य बाजू पटलावर ठेवावी यासाठी अध्यक्षांची परवानगी मागून ही बाब पटलावर आणली. 


जेठमलानी - जोशी यांनी 22 जून 2022 रोजी जे पत्र पाठवले जे मेल द्वारे पाठवले तो मेल एकनाथ शिंदे यांना पाठवला तो मेल दाखवू शकता का ?


प्रभू- मी संगितले हे मी उद्या दाखवतो. चार वाजता जोशी निघून जातात ते निघून गेले नसते तर मी बोलवलं असता. मी सकाळच्या सत्रात सादर करतो. 


जेठमलानी - जर ते आता येथे असतील तर त्यांना बोलवू शकतो.


प्रभू - चेक करतो.


जेठमलानी -  परिच्छेद 51 मध्ये जे उल्लेख केल्यानुसार प्रतिवादी यांनी सांगितलं की निवडणुकीनंतर भाजप सोबतची युती ही शिवसेना पक्षाच्या हिताची होती पण मतदारांचा विश्वास घात करून शिवसेना पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली. 


प्रभू - हे खोटं आहे.


जेठमलानी -  प्रतिवादी हे भाजप संगनमत करून काम करत नव्हते तर त्यांचे भाजपच्या अनेक नेत्यांसोबत चांगके संबंध होते त्यानुसार ते काम करत होते.


प्रभू - हे खोटं आहे.


जेठमलानी - परिच्छेद क्रमांक 52 मध्ये ज्या आमदारांचा उल्लेख केला आहे त्यांनी कुठलेही चुकीचे काम केले नाही ? 


प्रभू - हे खोटे आहे.


जेठमलानी - परिच्छेद  53 मध्ये 25 जून 2022 ला जे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला अनिल देसाई यांनी पाठवले ते पत्र चुकीच्या आक्षेपावर चुकीच्या तथ्यावर पाठवले आहे.


प्रभू - हे खोटं आहे.


जेठमलानी - 30 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांना  एकनाथ शिंदे, ताजनी सावंत, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांना शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक पदावरून काढण्याचा अधिकार नव्हता. 


प्रभू - हे खोटं आहे. 


22 जून 2022 रोजी सुनील प्रभू यांच्या वतीने  एकनाथ शिंदे यांना पाठवलेला मेल ठाकरे गटाच्या वतीने सादर करण्यात आला जो विधिमंडळ पक्ष कार्यालय सचिव विजय जोशी यांनी पाठवला होता. त्याची कॉपी अध्यक्षसमोर ठेवली आहे. 22 जूनचा पत्र हे 23 जून 2022ला मेल द्वारे पाठविण्यात आले असल्याचे समोर आलं आहे.


आजच्या दिवसभरातील सुनावणी संपली असून गुरुवारी सकाळी 11 वाजता सुनावणीची कार्यवाही सुरू होईल. 


संबंधित बातम्या  


प्रतोदपदी निवड पक्षप्रमुखांकडून, आमदारांना हटवण्याचा अधिकार नाही; सुनिल प्रभूंचा पलटवार, आजच्या सुनावणीत काय झालं?  


आता भरत गोगावलेंसह 5 आमदार आणि एका खासदाराची उलट तपासणी, ठाकरे गटाच्या वकिलांचे टोकदार प्रश्न तयार