बीड : खेळामध्ये राजकारण (Politics) यायला नको पाहिजे असे सर्वजण म्हणतात, मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणामध्ये सर्व खेळ आले आहेत. आत्ताच राजकारण म्हणजे कबड्डीच्या (Kabaddi) खेळासारखा झाला असल्याचे वक्तव्य भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी केले आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी येथे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी प्रीतम मुंडे आष्टी येथे आल्या होत्या. यावेळी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर प्रीतम मुंडे यांनी आपल्या भाषणातून राजकारणात कशा प्रकारचे खेळ सुरू आहे यावर भाष्य केले आहे. 


तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यातले अनेक खेळाडू हे वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अशा स्पर्धांचे आयोजन करून नवीन खेळाडू तयार झाले पाहिजेत अशी प्रतिक्रिया देखील प्रीतम मुंडे यांनी दिली. आमदार सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आल्या असता त्या बोलत होत्या. 


प्रीतम मुंडे स्पष्टच बोलल्या...


मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घटना घडतायत. राजकीय टीका करण्याची पातळी घसरली, कोण कोणत्या पक्षात कधी जाईल याची शाश्वती नाही. दरम्यान, या सर्व परिस्थितीवर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज्यातील सध्याचे राजकारण म्हणजे कबड्डीच्या खेळासारखा झाला असल्याचे मुंडे या म्हणाल्या आहेत. एवढंच नाही तर खेळामध्ये राजकारण यायला नको पाहिजे असे सर्वजण म्हणतात, मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणामध्ये सर्व खेळ आले आहेत, असेही मुंडे म्हणाल्या आहेत. 


मतदारसंघात दौरे वाढले...


मागील काही दिवसांपासून प्रीतम मुंडे यांचे बीड जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत. आष्टी तालुक्यात पार पडलेल्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयच्या परिसरात नि:शुल्क सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतीम मुंडे यांचू उपस्थिती पाहायला मिळाली. तर, आष्टी तालुक्यातील जेष्ठ नेते श्बबनराव अण्णा झांबरे यांच्या हिंगणी टाकळसिंग येथील निवासस्थानी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात देखील प्रतीम मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सोबतच आष्टी तालुक्यातील साबलखेड इथे आज साबलखेड चिंचोली या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून उपस्थितांशी संवाद साधला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pankaja Munde : ... तर मला 'तिथून' कोणीच हटवू शकणार नाही, नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे