मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी (Shiv Sena Mla Disqualification case ) विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु आहे. दरम्यान आजच्या सुनावणीतही ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी घेण्यात आली. जेष्ठ कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी सुनील प्रभूंना काही प्रश्न विचारले. दरम्यान या प्रश्नांची उत्तर देखील सुनील प्रभूंनी दिली. तसेच ही सुनावणी ठरलेल्या वेळापत्रकारप्रमाणे पार पाडण्यात यावी असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलं. दरम्यान या संपूर्ण युक्तिवादामधील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी
जेठमलानी
उद्धव ठाकरे गटाला तेव्हा आणि आजही शिवसेना पक्षाच्य व्हिपला संघटनात्मक पाठिंबा नव्हता?
सुनील प्रभू -खोटे आहे
जेठमलानी-आपण उल्लेख केलेल्या पत्रानुसार शिवसेना घटनेतील दुरुस्ती कधीही सादर करण्यात आली नव्हती ?
प्रभू - हे खोट आहे
जेठमलानी - 2018 साली जी घटना दुरुस्ती शिवसेनेमध्ये करण्यात आली त्यामध्ये आपत्रता प्रकरणात नाही तर इतर सर्व ठिकाणी प्रतिवादी आमदारांनी या घटना दुरुस्तीला आव्हान दिले आहे ?
प्रभू - हे खोटं आहे
जेठमलानी -2018 साली कथित शिवसेना पक्षाची घटना दुरुस्ती करण्यात आली ती दुरुस्ती बनावट आहे ?
प्रभू -हे खोटं आहे
जेठमलानी - उद्धव ठाकरे ज्या समूहाचा नेतृत्व करतात तो समूह आपत्रता कारवाई किंवा इतर कुठल्याही कारवाई साठी शिवसेनेचा प्रतिनिधित्व करू शकत नाही
प्रभू - हे खोट आहे
जेठमलानी -एकनाथ शिंदे यांना शिवसेना संघटनेचा मोठा पाठींबा होता आणि त्यामुळेच 2018 साली कथित घटना दुरुस्ती शिवसेना घटनेत करण्यात आली
प्रभू - हे खोटं आहे
जेठमलानी - 25 जून 2022 राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत जे संघटनात्मक बदल करण्यात आले तसा बदल करण्याची घटना परवानगी देत नाही
प्रभू - हे खोटं आहे
जेठमलानी - 25 जून 2022 शिवसेनाच्या पक्षात संघटनात्मक बदल यासाठी करण्यात आले जेंव्हा उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांना हे समजले की कथित 2018 सालच्या घटना दुरुस्तीचा काहीच फायदा नाही ?
प्रभू - खोट आहे
जेठमलानी - राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत किती सदस्य असतात ?
प्रभू - 175 ते 180
जेठमलानी -नॅशनल एक्झिक्युटिव्ह हा शब्द कोणत्या अन्वयार्थाने वापरला आहे? त्याचा मराठी अर्थ काय आहे?
प्रभु - ऑन रेकॉर्ड आहे
जेठमलानी -शिवसेनेच्या कोणत्या घटनेमध्ये नॅशनल एक्झिक्युटिव्ह शब्द वापरला आहे? त्याचा मराठी अर्थ काय?
प्रभु - ऑन रेकॉर्ड आहे
अध्यक्ष नार्वेकर - रेकॉर्ड हे खूप मोठे आहे, तुम्हाला त्याचे थेट उत्तर द्यावे लागेल. तुम्हाला अर्थ माहिती नसेल तर तसे सांगा.
जेठमलानी -आम्ही तुमच्यासाठी एवढे मराठीचे इंग्रजीत भाषांतर करत आहोत, तर तुम्ही थोडे इंग्रजीचे मराठीत भाषांतर करा.
प्रभु - प्रतिनिधी सभा.
जेठमलानी - महाराष्ट्र विधानसभेने जे आमदार परिचय पुस्तिका प्रकाशित केली जाते जी 22 जून आणि 23 जून 2022 रोजी अस्तित्वात होती ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा इमेल आयडी तुम्ही अध्यक्ष यांना वाचून दाखवावा ?
प्रभू-
mininistereknathshinde@gmail.com
22 जून आणि 23 जून ची नोटीस एकनाथ शिंदे यांना ज्या इमेल आयडी वर पाठवली तो इमेल आयडी एकनाथ शिंदे यांचा नव्हताच, जेठमलानी यांनी दिला आमदार परिचय पुस्तिकेचा दाखला
*पुस्तिकेनुसार एकनाथ शिंदे यांचा इमेल आयडी ministereknathshinde@gamil .com
तर ठाकरे गटाकडून ज्या इमेल वर इमेल लेटर पाठविण्यात आले तो इमेल आयडी विधिमंडळ पक्ष कार्यालयातील माहिती नुसार eknath.shinde@gmail.com याच इमेल वर पाठविण्यात आला असल्याचं म्हणणं आहे.
जेठमलानी - तुम्ही जो 22 जून आणि 23 जून रोजी एकनाथ शिंदे यांना पाठवलेला मेल काल सादर केला तो बनावट आहे. तो इमेल आयडी हा एकनाथ शिंदे यांचा त्यावेळी नव्हता
प्रभू - हे खोटं आहे
जेठमलानी - जो मेल तुम्ही सादर केला त्याचा इमेल आयडी 29 नोव्हेंबर 2023 रोजी तयार करण्यात आला होता ?
प्रभू - हे खोटं आहे
कामत - तुम्ही एकनाथ शिंदे यांचा इमेल चुकीचा आहे म्हणू शकत नाही
तुम्ही सगळे बनावट आहे असं बोलणे चुकीचे आहे
साक्ष नोंदविण्यासाठी ज्यांनी मेल पाठवला आहे ते विजय जोशी यांची उलट तपासणी मध्ये हे प्रश्न विचारले
त्यांचा मेल चेक करा तव दाखवतील मेल कधी कसा पाठवला ते दाखवतील
जेठमलानी - तुम्ही तुमच्या सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी 30 जून 2022 पत्र लिहून त्यामध्ये शिंदे हे पक्षविरोधी कारवाई मध्ये भाग घेत आहेत आणि आपण पक्षाच्या पदाचा त्याग केला आहे या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहेत का ?
प्रभू - हे बरोबर आहे
जेठमलानी - या पत्रानुसार 22 जून 2022 रोजी च एकनाथ शिंदे सह प्रतिवादी आमदारांनी जर पक्षाच्या पदाचा त्याग केला अस म्हणत असत तर त्यांना व्हीप लागू होत नाही ?
प्रभू - हे खोटं आहे
कामत - जर अध्यक्ष यांनी प्रतिवादी आमदारांच्या आमदारांबद्दल कुठलाही निर्णय घेतला नसेल तर मग त्यांनी पदाचा त्याग केला ? असा प्रश्न तुम्ही कसे उपस्थित करू शकता ?
जेठमलानी - प्रभू, 2 जुलै 2022 रोजी कथित प्रतोद म्हणून अश्या लोकांना व्हीप पाठवला होता ज्यांनी पक्षाचे पद सोडले
जेठमलानी - दोन जुलै 2022 रोजी तुम्ही व्हीप दिला आहे तो प्रतिवादी आमदार हे तुमचे सदस्य होते म्हणून दिला होता का ?
प्रभू - हो, हे रेकॉर्ड वर आहे