Vijay Chaudhary: कुस्तीचं मैदान गाजवणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) विजय चौधरी (Vijay Chaudhary) आता निवडणुकीचं (Elections 2023) मैदान मारण्याच्या तयारीत आहेत. ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्रातील (Maharashtra News) पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये (Anti-Bribery Department of Pune Division) अप्पर पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) म्हणून कार्यरत असलेले विजय चौधरी आता लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना स्वतः विजय चौधरी यांनी यासंदर्भात इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात? याबाबत विचारणा झाल्यानंतर माझी पहिली पसंती भाजपला (BJP) असे असं विजय चौधरी म्हणाले. त्यासोबतच आम्ही फक्त इच्छा व्यक्त करतोय, अजून कोणत्याही पक्षाशी बोलणं झालेलं नाही, असंही विजय चौधरी म्हणाले. दरम्यान, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि अँटी करपशन अधिकारी विजय चौधरी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अजून कोणत्याही पक्षाशी आपलं बोलणं झालं नसलं तरी आपली पहिली पसंती भाजपाला राहणार आहे, असं विजय चौधरी बोलताना म्हणाले. तसेच, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबत विचारल्यावर जळगाव लोकसभा मतदार संघासाठी (Jalgaon Lok Sabha Constituency) आपली पसंती राहणार आहे, असं विजय चौधरी म्हणाले. त्यासाठी वेळ आली तर आपण नोकरीसुद्धा सोडणार असल्याचं विजय चौधरी म्हणाले आहेत. 


विजय चौधरी आहेत कोण? (Who is Vijay Chaudhary?)


जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, इतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरलं आहे.


ACP विजय चौधरी हे एक भारतीय कुस्तीपटू आणि तीन वेळा सर्वात प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी विजेते आहेत. त्यांनी 2014, 2015 आणि 2016 मध्ये सलग तीन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. ही कामगिरी करणारे नरसिंह यादवनंतर विजय चौधरी हे दुसरे कुस्तीपटू ठरले आहेत.