सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे याचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर साताऱ्यात प्रथम दाखल झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं.यावेळी शशिकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. कोणी भाजपला काय विचारायचे, कोणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, असं उत्तर शशिकांत शिंदे यांनी दिलं.  

Continues below advertisement


शशिकांत शिंदे काय म्हणाले?


सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा, किसनवीरांच्या विचाराचा जिल्हा आहे. आज जे प्रेम मिळतंय तेच प्रेम चव्हाण साहेबांप्रमाणे शरद पवारांवर देखील सातारा जिल्ह्याने केलं आहे. काही अपवाद वगळता हा जिल्हा कधी तुटला नव्हता मात्र पक्ष फोडून हा जिल्हा तोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही निष्ठावंत कायम राहिलो. आज सातारा जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला शरद पवारांनी महाराष्ट्राचं प्रांताध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या माझ्या सर्व नेत्यांनी निर्णय घेतला. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला वंदन करण्यासाठी जात असताना आज साताऱ्यामध्ये माझं उस्फूर्त स्वागत होत आहे. ही एक ऊर्जा आहे. भविष्य काळात लढण्याची प्रेरणा देणारे हे सत्कार आहेत. सातारच्या जनतेनं माझ्या सारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रात नेतृत्त्व करण्याची संधी द्यावी. 


विलिनीकरणाचा असा कोणताही प्रस्ताव नाही, कोण चर्चा का करतात माहिती नाही. मी पक्ष वाढीसाठी अहोरात्र काम करणार आहे. विलिनीकरणासाठी ज्यांना कोणाला भाजपला विचारायचं हा त्यांचा प्रश्न,त्यांनी काय स्टेटमेंट दिले याला महत्व नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्याचं काम करणार आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाल्या.  


पक्ष विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही. कोण चर्चा का करते मला माहिती नाही. कदाचित मी प्रांताध्यक्ष झालो आहे, पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. पक्ष वाढीसाठी अहोरात्र कष्ट करुन पक्ष मजबूत करणार आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले. विलिनीकरण हा सध्या चर्चेचा विषय नाही, मला काम करायला सुरुवात करू द्या काम करायच्या अगोदरच विलिनीकरणाचा विषय आणताय, पक्ष मजबूत करू द्या आपोआप याची नोंद राज्य आणि पक्ष घेईल, असं शशिकांत शिंदे म्हणाले. 


सुनील तटकरे काय म्हणाले होते?


राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा स्थानिक पातळीवरती सुद्धा नाही आणि वरिष्ठ पातळीवरही झाली नाही हे मी वारंवार स्पष्ट केलं आहे. ज्यावेळी असा काही प्रस्ताव असेल त्यावेळी कोअर कमिटी त्याबाबत निर्णय घेईल. पण त्यावर निर्णय घेत असताना, भाजपच्या नेतृत्वाला विचारावं लागेल असं सुनील तटकरे म्हणाले.