Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी (Vaishnavi Hagawane Case) विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, वैष्णवीचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळेच झाला आहे. तिचा मृत्यू केवळ नैसर्गिक किंवा सरळ आत्महत्येचा प्रकार नसून, तो हुंडाबळीचा गंभीर प्रकार असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची दिशा हुंडाबळीच्या अंगानेच पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे समितीने सुचवले आहे. आता या अहवालावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देत असताना म्हटले आहे की, काल विधानसभेत या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. मात्र, हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही.
वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा
अरे कुणाला मूर्ख बनवता? सध्या पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. असे असताना 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मी आधीच म्हटले होते, प्रकरण ताजे असेपर्यंत आम्ही काहीतरी करतोय असे दाखवले जाईल, प्रकरण शांत झाले की आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाईल आणि तसंच घडतंय, असा आरोप त्यांनी पोलिसांवर केला. तर शासनाला जनाची नाही तर मनाची असेल तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा, तिच्या तहान बाळाचा विचार करा? असंही आवाहन देखील त्यांनी सरकारला केले आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात तपासात त्रुटी
वरिष्ठ पो.अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता.
जालिंदर सुपेकरांना तपासापासून दूर ठेवा.
प्रकरण आत्महत्येचे दिसत असले तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे आहे.
जालिंदर सुपेकरांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करा.
वैष्णवी हगवणेंना पती,सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण,छळ, जाच झाला.
हुंडा रुपात ब्रँडेड गाडी, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम घेतल्याचे सबळ पुरावे.
तपास तातडीने पूर्ण करा, आरोपी आणि सहआरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या.
आणखी वाचा