Mangal Prabhat Lodha: राज्यातल्या अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर बेपत्ता मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नेमणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walker Murder Case) हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.    


काय म्हणाले मंगल प्रभात लोढा? 


मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले आहेत की, शुक्रवारी महिला आयोगाची एक बैठक झाली. तिथे ते म्हणाले आहेत की, श्रद्धा वाळकरचं जे प्रकरण झालं, त्यानंतर महिला आयोगाने एक विशेष पथक नेमलं पाहिजे. ते म्हणाले, लग्नानंतर ज्या मुलींचा आपल्या मूळ कुटुंबियांशी संपर्क तुटला आहे, त्यांची सध्या काय परिस्तिथी आहे. तसेच आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन ते एका व्यक्तीसोबत निघून गेल्या आहे. ज्यामुळे आपल्या कुटुंबियांना ते तक्रारही करत नाही. ज्या व्यक्तीसोबत त्या निघून गेल्या आहेत. त्या व्यक्तीला माहित आहे की, या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांचं समर्थन नाही. म्हणून त्यांचं काय होत हे आपण श्रद्धा वाळकर प्रकरणातून पाहिलं आहे. अशा मुलींना मदत करता यावी म्हणून मी एक विशेष पथक नेमण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


ज्यावेळी तुम्ही महिला आयोगाच्या या बैठकीत होता, त्यावेळी लव्ह जिहादमुळे तरुणी बेपत्ता होत असल्याचा काही डेटा तुमच्यासमोर मांडण्यात आला का? असा प्रश्न एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी मंगल प्रभात लोढा यांना विचारला असता ते म्हणाले आहेत की, डेटा नाही. मात्र असे 10 ते 12 प्रकरण माझ्या समोर आहेत. त्यातही असं काही झालं असू शकतं, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच विशेष पथक नेमण्याचे आदेश दिले असल्याचे ते म्हणाले आहेत.  


महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होऊ देणार नाही असं लोढा म्हणाले होते. यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, अफगाणिस्थानमध्ये काय-काय झालं आहे, हे सगळ्यांना माहित आहे. फाळणीच्या वेळी अफगाणिस्थानमध्ये जे दहशतवादी ते तिथून निघून गेले, असं सर्वाना वाटलं होत. मात्र यातले काही लोक तिथे राहिले. नंतर याच लोकांनी एकत्र येऊन काय केलं हे सगळ्यांना माहित आहे. आपल्या इथेनी बांगलादेशी आणि रोहिंग्या मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. त्यानं थांबवावं लागेल, असं माझं म्हणणं होत.