मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अलीकडेच एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची देखील चर्चा रंगू लागली? मुळात शरद पवारांनी (Sharad Pawar) आत्ताच्या परिस्थितीत हे वक्तव्य का केलं असावं? याचा आढावा घेणारा हा एबीपी माझाचा रिपोर्ट. 


शरद पवार यांनी नुकतीच 'द इंडियन एक्सप्रेस' या दैनिकाला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत भाजप विरोधातील अंडरकरंट लक्षात घेता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्या विचारधारेला समोर ठेवून अनेक छोटे पक्ष आमच्या सोबत येतील असा विश्वास बोलून दाखवला आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची देखील चर्चा जोर धरू लागली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर वर्षभरापूर्वी अशीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती राष्ट्रवादीतील एका गटाचा असं म्हणणं होतं की आपण आता काँग्रेसमध्ये विलीन होऊन काँग्रेस म्हणून निवडणुकांना सामोरे जाऊयात. त्यावेळी काँग्रेसमधून देखील महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला यांनी शरद पवार यांच्यासमोर हाच प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली होती.


इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत शरद पवारांनी हे देखील स्पष्ट केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत जो निर्णय असेल तो सर्वानुमते घेतला जाईल. आमच्या पक्षात कोणतेही पावर उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे देखील पवारांनी स्पष्ट केले आहे.


शरद पवार काय म्हणाले? 


एबीपी माझा ने या विषयासंदर्भात ज्यावेळी शरद पवारांशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की, सध्या भाजप विरोधात अंडर करंट जाणवत आहे. राजकीय पक्षांच्या मोठ्या वर्गाला भाजप आणि मोदी आवडत नाहीत. त्यामुळे ते एकत्र येऊ लागले आहेत. देशातील मूड नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांना अनुसरून सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामुळे आता मी काळात मोदींविरोधात अनेक घटक पक्ष आमच्या विचाराला अनुसरून सोबत येताना पाहायला मिळतील.


एकीकडे इंडिया आघाडीवर एक संघ नसल्याची टीका होत असताना शरद पवारांची नुकतीच प्रसिद्ध झालेली मुलाखत अतिशय महत्त्वाची आहे कारण या निमित्ताने आगामी काळातील राजकारणाचे संकेत शरद पवारांनी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात उभारी घेताना पाहायला मिळत आहे. अशावेळी आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसचे नेतृत्वात एकत्र येऊन एनडीएला आव्हान निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.


देवेंद्र फडणवीसांची टीका


शरद पवारांच्या या वक्तव्यावर टीका करण्याची संधी सत्ताधारी पक्षांनी मात्र सोडलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवण्याचा झेपत नाही असे म्हटले आहे तर मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य करत पक्ष विलीन करण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे, असे म्हटले आहे. 


आणखी वाचा


शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार की नाही, हे 'या' एका गोष्टीवर अवलंबून; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वाचं वक्तव्य