Sharad Pawar, Beed Meeting : "शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन कोणी मनोज जरांगे असो की आणखी कोणी पुढे येत असतील. तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या जिल्ह्यात येऊन जरांगे पाटलांना भेटलो भेटलो. त्यांना एक विनंती केली की, या राज्यात कोणताही जातीचा किंवा धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेऊ", असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. बीडमध्ये ( Beed Meeting) बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बजरंग सोनवणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही केले. 


शरद पवार म्हणाले, आज मला एका गोष्टीची आठवण होते. बीड जिल्ह्यात संकट असेल दुष्काळ असेल, पण मनाने अतिशय दिलदार लोकांचा हा जिल्हा आहे. एकदा या जिल्ह्यामध्ये मी विनंती केली आणि विनंतीला मान देऊन जिल्ह्याने सर्वच्या सर्व आमदार आमच्या पक्षाचे निवडून दिले. या जिल्ह्याने ऐतिहासिक काम करुन दाखवले. आमदार दिले पण सत्ता दुसऱ्यांना दिली. आमदार सगळे आपले पण सत्ता दुसरीकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचं दुखणं कमी कसं करायचं? असा सवालही पवार यांनी केला. 


व्यासपीठावर बसल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाली


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी बीडमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला माजी हजेरी होती. व्यासपीठावर बसल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाली. या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं. नाना पाटील सातारा जिल्ह्याचे होते. उभे राहिले बीड जिल्ह्यात. या जिल्ह्यातील जनतेने स्वातंत्र्यासाठी त्याग केला. मोठ्या नेत्याचा सन्मान केला. नाना पाटील यांनी या जिल्ह्यात घोषणा केली होती. मात्र, सरकार बदल्यामुळे ती त्यांना पाळता आली नाही. 


सत्ता हातात आहे, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वापरली नाही


मात्र, बीड जिल्ह्याने आमचे आमदार सर्व आमदार निवडून दिले. त्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि आठ दिवसाच्या आत 71 हजार कोटींचं कर्ज माफ केलं. याचा लाभ देशातील सर्व राज्यांना झाला. ही कर्जमाफी संबंध देशातील लोकांना मिळाली. आज काय स्थिती आहे? देश नरेंद्र मोदींच्या हातात आहे. अनेक भाषणं करतात. मात्र, शेतमालाला किंमत नाही. सर्व देशातील सत्ता हातात आहे, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वापरली नाही. दिल्लीत पंजाब, हरियणा भागातील शेतकरी दिल्लीत बसले. हमीभाव मिळावी, अशी मागणी केली, असंही शरद पवार म्हणाले. 




इतर महत्वाच्या बातम्या 


पुष्पाची सिरीज येणार, धनंजय मुंडेंचा चंदनावरुन बजरंग सोनवणेंवर हल्ला, पवारांना म्हणाले, मराठा आरक्षणावर बोला