Sharad Pawar and Devendra Fadnavis  : " महाराष्ट्रातील सगळे सहकारी कारखाना पाहिले तर काय चित्र दिसतं. आधी 80  टक्के सहकारी कारखाने होते आणि 20 टक्के खासगी कारखाने होते आता 50 टक्के खासगी कारखाने झाले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना विनंती आहे की एक कमिशन अपॉइंट करा आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करा. नेमक्या काय अडचणी आहेत हे पाहा", असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. मुंबईतील (Mumbai) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ घटनेच्या 150 वर्षपुर्तीनिमित्त  'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)आणि उपमुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. 

पूर्वी साखर कारखानदारी नव्हती गूळाचा धंदा होता - शरद पवार 

शरद पवार म्हणाले, दख्खनचा उठाव इथ जो संघर्ष झाला त्यावेळी इंग्रजांना शेतकऱ्यांच दुःख समजलं आणि त्यांनी उपाय योजना केल्या. त्यावेळी सावकार आणि व्यापारी यांच्याकडून कर्ज शेतकऱ्यांना घ्याव लागत होतं मात्र ते बंद झालं आणि सहकारातून त्यांना कर्ज मिळू लागलं. राज्य सहकारी बँकेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पूर्वी साखर कारखानदारी नव्हती गूळाचा धंदा होता. एक व्यापारी गूळ करायचा आणि त्याच त्या मार्केटवर दबाव असायचा मात्र हे बदलण्यात आलं आणि त्यावर पर्याय म्हणून या बँकेची स्थापना करण्यात आली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील सगळे सहकारी कारखाना पहिले तर काय चित्र दिसतं. आधी 80 टक्के सहकारी कारखाने होते आणि 20 टक्के खासगी कारखाने होते आता 50 टक्के खाजगी कारखाने झाले आहेत.  देवेंद्र फडणवीस याना विनंती आहे की एक कमिशन अपॉइंट करा आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करा. नेमक्या काय अडचणी आहेत हे पाहा. 

शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात 50 टक्के सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. हे शरद पवारांनी सांगितलं हे खरं आहे. साखर उद्योगात केवळ साखरेवर कारखाना चालू शकत नाही आता त्याच्याशी संबंधित इतर व्यवसाय करावे लागणार आहे. सहकारी कारखान्यात प्रोफेशनल काम पाहिला मिळत नाही. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोगिरभरती पाहिला मिळत आहे. सहकारातील महत्वाचा घटक म्हणजे सहकारी संस्था आहेत. आम्ही सहकार कायद्यात नवीन नियम घातला. सेल्फ रीडेव्हलपमेंट ही योजना देखील आम्ही राबवत आहोत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दहशतवाद्याच्या मृतदेहासमोर लष्कराच्या उपस्थितीत कलमा पडला, मृत व्यक्ती निष्पाप असल्याचा दावा, पाकिस्तान तोंडावर आपटला

Raid 2 Box Office Collection Day 11: 'रेड 2'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, 'सिकंदर'ला पछाडलं; 'छावा'लाही मागे टाकणार?