पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. पवार यांच्या विधानावर सर्वच राजकीय पक्ष भूमिका मांडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ देत, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा पक्षाच्या (Shivsena) प्रमुखांना थेट ऑफर दिली. आता, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींच्या ऑफरवर पवारस्टाईल प्रत्युत्तर दिलं आहे. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात शरद पवारांनी म्हटले. 


नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात आहे, मोदींनी सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकलंय. गांधी-नेहरुंची विचारधारा आम्हाला मान्य आहे. हा देश एकसंघ ठेवायचा आहे, त्यासाठी सर्वच धर्मांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे. पंतप्रधानांनी एका धर्माविषयी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून आलं. एका समाजाविरुद्ध वेगळी भूमिका मांडल्यास ऐक्य राहणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी मोदींच्या ऑफरवर भाष्य केलं. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात पवारांनी सांगितले. तसेच, ही मोदींची अस्वस्थता आहे, त्यातूनच ते अशी विधानं करत आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची ऑफर धुडकावली. मोदींना जरी आमची गरज पडत असेल तरी आम्ही आमच्या बुद्धीला जे पटते, त्या आमच्या विचारांना सोडून कुठेही जाणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 


काय होती मोदींची ऑफर


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या विधानावर भाष्य केले. मोदी म्हणाले की,  गेल्या 40 ते 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असं वक्तव्य केले असावे असं मला वाटतं. चार जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असं त्यांना वाटत आहे. याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे. आता यावर ठाकरे आणि पवार यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


पंतप्रधान मोदींची ठाकरे, पवारांना मोठी ऑफर


याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे. आता यावर ठाकरे आणि पवार यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दाभोलकर हत्या प्रकरणावर पवार म्हणाले


नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणावर भाष्य करताना हा कोर्टाच निर्णय असल्याचे पवार यांनी म्हटले. तसेच, तिघांन निर्दोष सोडण्यात आले, त्यावर भाष्य करताना पवारांनी महाराष्ट्र सरकारला आवाहन केलं आहे. राज्य सरकारने या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात अपील करण्याचे शरद पवारांनी सूचवले. 


हेही वाचा


PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना मोठी ऑफर; म्हणाले, काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या!


Dr. Narendra Dabholkar Case Verdict : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : दोघांना जन्मठेप, तीन आरोपी निर्दोष कसे ठरले?