Sharad Pawar on Vijaysinh Mohite–Patil : गेल्या अनेक आठवड्यांपासून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि विजयसिंह मोहिते पाटील एका लग्न समारंभात एकत्रही आले होते. त्यानंतर मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली होती. आज अखेर खुद्द शरद पवार यांनीच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रवेशाची माहिती दिली आहे. दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांची या सर्वाला मान्यता आहे का? यावरही शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
विजयदादांचे काही शारीरिक प्रश्न आहेत. त्यांना बोलायला त्रास होतो. मात्र, तिथला प्रत्येक निर्णय विजयदादांच्या संमतीने आणि मार्गदर्शनाने त्यांचे सहकारी निर्णय घेतील. तशीच त्यांची मनस्थिती आहे, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पष्ट केलं. मूळ पवार आणि बाहेरुन आलेला पवार यामध्ये फरक आहे, असा टोलाही त्यांनी (Sharad Pawar) यावेळी बोलताना अजित पवार यांना लगावला.
सेवेचा आदर्श ठेऊन शाहु महाराज काम करत आहेत
पुढे बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, शाहू महाराजांबद्दल ते काय बोलले मला माहीती नाही, पण मंडलिक यांचा हा काही प्रश्न आहे का? म्हणजे हे लोक कोणत्या पातळी पर्यंत पोहोचलेत. सेवेचा आदर्श ठेऊन शाहु महाराज काम करत आहेत. या प्रकारची टीका विरोधक करत आहेत. याचा अर्थ विरोधकांची मानसिकता काय आहे? हे दिसत आहे. शाहू महाराजांविषयी जनमाणसात आदर आहे.
अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर
माझी निवडणूक ,अजितची निवडणूक असो, किंवा सुप्रियाची निवडणूक असो माझ्या कुटुंबातील बाकीचे घटक लोकांच्यात जातात. भूमिका मांडतात आणि लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. माझी भावंड मी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा प्रचारासाठी आली नाहीत. मात्र, आता पायाला भिंगरी लावून फिरत आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांच्या या टीकेला शरद पवारांनी (Sharad Pawar) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या