Sharad Pawar on Narendra Modi, Pune : "जातीयवादी लोकांच्या हातात सत्ता आहे. ही सत्ता उखडून टाकण्याची वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी ठेवण्याची वेळ आलीय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार आहे. मोदींचे ऐकत नाही म्हणून तुरुंगात टाकले आहे. लोकशाहीची हत्या करण्यात येत आहे",असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. दौंड शहरातील मातंग समाजाच्या मेळाव्याला शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीतील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महापुरुषांचे विचार पुढे न्यायचं काम आम्ही करत आहोत
शरद पवार म्हणाले, तूर जिल्ह्यातील युवकाच्या अंगावर पेट्रोल टाकून मारले. सरकारची जबाबदारी सर्वसामान्य लोकांची काळजी घेणे. तीन वेळा मला काम करण्याची संधी दिली. पण लोकांसाठी काही केले नाही. महापुरुषांचे विचार पुढे न्यायचं काम आम्ही करत आहोत. मला संधी द्या मी तुमच्यासाठी कटिबद्ध आहे. मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात बैठक घेणार आहोत. मातंग समाजामध्ये कर्तुत्ववान माणसं आहेत. मातंग समाजासाठी सवलती आहेत. त्यासाठी त्यांची स्वतंत्र मागणी होती,त्याचा विचार सरकारने करावा, असं शरद पवार यांनी सांगितले.
मणिपूरची स्थिती गंभीर आहे
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, चार वर्षांपूर्वी पार्लमेंटमध्ये ओडिसासंबंधीत प्रश्न निघाले. ओडिसामध्ये आदिवासी लोकांची सेवा करणाऱ्या ख्रिस्ती बांधवांवर हल्ले करण्यात आले. आम्हाला ही माहिती समजल्यानंतर आम्ही ओडिसामध्ये गेलो. ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांना धीर दिला. तेथील सरकारशी आम्ही आग्रह केला. ज्यांनी हल्ला केला, त्यांच्यावर खटले भरा. त्यांना अद्दल शिकवा, असा आग्रह आम्ही केला. आज दुर्दैवाने अशी स्थिती मणिपूरला झाली. मणिपूरची स्थिती गंभीर आहे. समाजाच दोन भाग पडलेत.
पीएम मोदी देशात कानाकोपऱ्यात जातात पण मणिपूरमध्ये जात नाहीत
गुंड प्रवृती डोक वर काढते. तेव्हा ज्यांच्यावर हल्ला झालाय त्यांना धीर देण्याची जबाबदारी सरकारची असते. सरकारने ते काम केले जात नाही. पीएम मोदी देशात कानाकोपऱ्यात जातात पण मणिपूरमध्ये जात नाहीत. त्यांची भूमिका न्यायपूर्ण नाही. तुम्ही सर्वांनी सुप्रियाला 3 वेळेस निवडून दिलं, त्यांनी जबाबदारी पार पाडली. तिने जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. तिची सर्वात जास्त हजेरी संसदेत आहे. यावेळी सुप्रियाची खूण मनुष्य हातामध्ये तुतारी घेऊन उभा ती आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या