Sharad Pawar and Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला (Mahayuti) पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीची सात सोडत असल्याचे चित्र आहे. आता हिंगोलीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले राष्टवादीचे नेते अनिल पतंगे (anil patange) हे शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. यामुळे हिंगोलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.   

दि. 08 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawra) या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी खास हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सेनगाव येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमांमध्ये सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.  

8 जूनला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

याबाबत अनिल पतंगे यांनी म्हटले आहे की, सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही आठ तारखेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. सेनगाव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे. त्या कार्यक्रमासाठी जिवाभावाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेत हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत.  

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर घेतला निर्णय 

या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे आणखी काही मंत्री उपस्थित राहणार आहेत.  राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांना प्रतिसाद देत आम्ही सर्वजण पक्ष प्रवेश करणार आहोत. शरद पवार यांच्यावर आमची कोणतेही नाराजी नाही. कारण निष्ठावंत म्हटल्यावर नाराजी व्यक्त करणे चुकीच आहे. परंतु, काळानुसार कार्यकर्त्यांचा आग्रह होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मागील दहा वर्षापासून सातत्याने विरोधात बसतोय. त्याचा परिणाम विकासकामावर होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अनिल पतंगे यांनी दिली आहे.

आणखी वाचा 

Dhananjay Munde Beed: विपश्यना करुन बीडमध्ये परतताच धनंजय मुंडेंनी सगळ्यात आधी काय केलं? देशमुखांच्या घरी जाऊन....