Suresh Dhas on Ajit Pawar : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृण हत्या झाली. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुमच्याकडे पुरावे असतील तर ते न्यायालयाला द्या, सीआयडीला द्या, एसआयटीला द्या. पण पुरावे नसताना आरोप करणं कितपत योग्य आहे, अशी भूमिका घेतली. यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील सभेतून सुरेश धस म्हणाले की, आमचे दादा म्हणतात त्याचा संबंध नाही. सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो, पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवन राजेंच्या गावातून बोलतो, दादा तुमचे इथे नातं आहे, तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की याला काढा राव, अशी मागणी त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली.
सुरेश धसांनी सुचवलं 'हे' नाव
तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून कुणाला संधी द्यावी, याचे नाव देखील सुरेश धस यांनी सुचवले आहे. त्यांनी म्हटलंय की, यांच्या जागेवर सिंदखेडराजाच्या कायंदेला द्याना, तो निवडून आलाय. उद्या आम्ही जाणार आहोत, राजमातेच्या जन्मदिनी आम्ही सिंदखेडराजाला जाणार आहोत, त्या सिंदखेडराजाचा अजित दादाच्या पार्टीचा कायंदे आमदार आहे, असे म्हणत त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांचे नाव सुनावले. ते पुढे म्हणाले की, कायंदेला द्या, कुणालाही द्या, पण हे कशाला ठेवता? यांनी आमचं खूप वाटोळ केलंय. माणसांना मारायला लागलाय, दुपारी माणूस मारला आहे. पुन्हा याला सत्येत ठेवले तर हा दिवसाही मारेल, हे वाईट आहे. वालू काकाला कशाला दोष देता? वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही,असं कसं? हे वागणं बरं नव्हं, असे म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
आणखी वाचा
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल