सांगली : नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? असं म्हणत शिवसेला (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासंदर्भातील केलेल्या विधानाचा पुनरुच्चार केला. सांगलीत संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्यातील चर्चेदरम्यान संजय राऊतांनी हे विधान केलंय. तर अमरावतीच्या सभेत संजय राऊतांनी खासदार नवनीत राणांवरील केलेल्या टीकेमुळे राऊतांवर टीकेची झोड उठलीय. शुक्रवारी वर्ध्यातील सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना इशारा दिला असून, नवनीत राणांवरील विधानावर महिला उत्तर देतील, असं फडणवीस म्हणाले आहेत.


संजय राऊतांच्या निषेधार्थ प्रदर्शने


शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दहिसरमध्ये भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संजय राऊत यांच्या विरोधात निदर्शने होत आहेत.


भाजप महिला कार्यकर्त्यांकडून बॅनरवर शाही फेक


संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन भाजप महिला कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्या फोटो असलेल्या बॅनरवर शाही फेक करून बॅनरवर जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले. 


नीलम गोऱ्हेंकडून राऊतांच्या वक्तव्याचा समाचार


नवनीत राणांवर केलेल्या टीकेवरून नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला असून महिलांवर गलिच्छ भाषेत आरोप करणारे हे हिरो बनण्याच्या नादात झिरो होतात तर त्यांच्या सकाळच्या डराव डराव मध्ये काही तथ्य नसते असा आरोप नीलम गोरे यांनी वाशिममध्ये पत्रकार परिषदेत केला. 


नेमक काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?


काही व्यक्तींना असं वाटत  शिवराळ भाषा वापरून आपण हिरो ठरतो. मात्र, अस महिला बद्दल वाईट बोलणारे झिरो आहेत. राऊतांवर आरोप करणाऱ्या महिलांना त्यांनी किती गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आम्ही ऐकलं आहे. आपल्या कुटुंबातील महिलांना चालतील, तेच शब्द इतर महिंलाबद्दल तेच वापरावेत. राऊतांनी नवनीत राणांबद्दल वापरलेला शब्द पुन्हा वापरणे योग्य नाही. त्यामुळे त्यांचा अपमान होईल. म्हणून मी तो शब्द बोलत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहील यावर निवडणूक आयोग याची दखल घेईल.


महत्वाच्या इतर बातम्या :


राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांच्या विरोधात, नाशिकची जागा सोडल्याने नाराजीचा सूर