Sanjay Raut: राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा अवलंब करण्याच्या शासनाच्या निर्णयाला सध्या राज्यभरातून तीव्र विरोध होतोय. हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव राज ठाकरेंच्या मोर्चावरून सरकारवर टोलेबाजी केलीय . (sanjay Raut) ठाकरे बंधूंनी एकत्र येणे या संदर्भात डोमकावळे कावकाव करत आहेत . या मोर्चामुळे जर हिंदी सक्ती रद्द करण्याचा निर्णय सरकार घेणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांचे स्वागत करू .शेवटी लोकभावने पुढे सरकारला झुकावं लागतं . असं खासदार संजय राऊत म्हणालेत . 

हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय .आज मुंबईतील आझाद मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शासन निर्णय याची गोळी करण्यात येणार आहे .की महाराष्ट्राची भूमिका आहे .साडेअकरा कोटी मराठी जनतेने एका आवाजात सांगितलं आहे 'आम्हाला ही सक्ती मान्य नाही ' असे म्हटले आहे .संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा तालुका आणि तहसील पातळीवर हजारो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत .

काय म्हणाले संजय राऊत ?

'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीसाठी एकत्र येऊन आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला यात सगळं आलं आहे .याला बिटवीन द लाईन्स म्हणतात .दोन पक्षांमध्ये आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे .त्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही. असं खासदार संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या शासन निर्णयाची आम्ही होळी करतोय .यासंदर्भात जर पहिलाच आदेश होता तर परत का काढला ? तेव्हा हे झोपले होते का ? सरकारला कळतय का ते काय बोलतात ? मी शासनात नसलो तरी शासन कसं चालतं हे मला माहिती .मी गेली 25 वर्ष संसदेत आहे .आमचं शासन चालतं तुमच्या गुंड, टोळ्या चालवतायत .असे खासदार संजय राऊत म्हणाले .

उद्धव राज ठाकरेंचा मोर्चा भविष्यातील युतीची नांदी?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मोर्चा ही भविष्यातील दोन ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असे मी म्हणत नाही .महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या  एकीकरणाची नांदी आहे .मराठी माणसाचं जे संघटन बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात उभं केलं, याला तडे देण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी केलं . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यान मराठी माणूस एकत्र होणार असेल तर त्याचं स्वागत करायला हवं .

 

हेही वाचा

Ajit Pawar on Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाबाबत अजित पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच....