BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका  निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना मुंबईत एक महत्त्वाची राजकीय घडामोडी घडली आहे. मुंबईत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाली. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे गुरुवारी मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांची मुलाखत आटोपून बाहेर पडत होते. यानंतर लगेचच संजय राऊत यांची मुलाखत होती. त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरुन एकनाथ शिंदे हेदेखील येत होते. हे दोन्ही नेते एकमेकांच्यासमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहून अभिवानद केले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत हे नुकतेच एका मोठ्या आजारपणातून बाहेर आले आहेत. ते आजारी असताना घरी होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोन करुन राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आज या कार्यक्रमात संजय राऊत थेट त्यांच्यासमोरच आले. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली. संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली. यानंतर एक-दोन मिनिटं जुजबी गप्पा मारुन हे दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले. मात्र, या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)

Continues below advertisement

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्ष फुटला होता. यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्याने तो पक्ष अधिकृत शिवसेना ठरला होता. या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड वितुष्ट आले होते. मुंबई महानगपालिका निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यापासून ठाकरे कुटुंबीय सातत्याने एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. संजय राऊतही त्यांच्या पत्रकारपरिषदेत सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड करत असतात. मात्र, आज हे राजकीय मतभेद बाजुला सारुन या दोन्ही नेत्यांनी सुसंस्कृतपणे एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

आणखी वाचा

Continues below advertisement

ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती का? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली इनसाईड स्टोरी

मुंबईत महायुतीली किती जागा मिळणार? एकनाथ शिंदेंनी सांगितला आकडा, ठाकरे बंधुंवर साधला थेट निशाणा