Nashik Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीचा (Nashik Municipal Election 2026) प्रचार सध्या चांगलाच तापला असून प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजप नेते आणि उमेदवार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची भूमिका विशेष चर्चेत आली आहे. भाजपच्या (BJP) एबी फॉर्म संदर्भातील गोंधळामुळे या प्रभागात भाजपला दोन उमेदवारांना पुरस्कृत करावे लागले असून, या आव्हानात्मक परिस्थितीत सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी बडगुजर यांच्या खांद्यावर आली आहे. तर सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटात असताना भाजप नेत्यांनी सुधाकर बडगुजर हे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप केला होता. मात्र आता सुधाकर बडगुजर यांनी याच प्रकरणावरून मारलाय.
प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजप पुरस्कृत दोन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतांचे विभाजन टाळणे आणि अपक्ष उमेदवाराची निशाणी मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हे मोठे आव्हान बडगुजर यांच्यासमोर आहे. मात्र, राजकीय अनुभव आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर बडगुजर यांनी यासाठी विशेष रणनीती आखली आहे.
Sudhakar Badgujar : स्थलांतरित व कामगार मतदारांसाठी विशेष प्रचार
ग्राऊंडवर प्रत्यक्ष प्रचार करतानाच बडगुजर यांनी कामगार, स्थलांतरित आणि बाहेरगावी गेलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळी वाट निवडली आहे. मतदार यादीच्या आधारे कार्यकर्त्यांसह स्वतः सुधाकर बडगुजर फोनद्वारे थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. “मतदार यादीपासून थेट मतदारांपर्यंत” असा संपर्क साधत प्रचार अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात आहे.
Sudharkar Badgujar : प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
प्रभागातील एकही मतदार संपर्काबाहेर राहू नये, यासाठी घरोघरी भेटी, फोन कॉल्स आणि स्थानिक बैठका घेतल्या जात आहेत. विशेषतः निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी उपलब्ध नसणाऱ्या स्थलांतरित मतदारांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
Sudhakar Badgujar: आरोपांना उत्तर म्हणून पोलिस व्हेरिफिकेशन जाहीर
दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ‘सलीम कुत्ता’ प्रकरण निकाली निघाल्याचे पोलिस व्हेरिफिकेशन सुधाकर बडगुजर यांनी सार्वजनिक केले आहे. एकाच प्रभागात दोन भाजप पुरस्कृत उमेदवार, अनोखी प्रचार पद्धत आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक 25 ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. येत्या काही दिवसांत बडगुजर यांची ही रणनीती मतदारांवर किती प्रभाव टाकते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nashik Election 2026 : प्रभाग 25 अ मध्ये तिरंगी लढत
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 अ मध्ये निवडणूक चांगलीच रंगतदार होत असून येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे अतुल सानप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अतुल लांडगे निवडणूक रिंगणात उतरले असून हा सामना विशेष लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा