Mumbai : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत जशास तसे उत्तर देणं हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना राऊतांनी सांगितलं की, बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचं नक्की पालन होईल. शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे. पाठीमागून वार आमच्यात चालत नाही. बैठकीत ज्या सूचना दिल्या आहे त्यांचं नकीच पालन होणार आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.


राऊतांनी सांगितलं की, 'काही राजकीय पक्ष महाराष्ट्रातील वातावरण जाती आणि धर्माच्या नावाखाली खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चूकीचं आहे. शिवसेनेच्या बदनामीचा आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटन आणि घटकांनी एकत्र येऊन सुरू केला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे. सरकारसमोर अडचणी निर्माण करायच्या आहेत. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे.'


शिवसेनेला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नसल्याचा इशारा राऊतांनी दिला आहे. आतापर्यंत आम्ही सत्ता आणि सरकार असल्याने संयम बाळगला. पण आता जर पाणी डोक्यावरून जात असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. मग त्यांना गटांगला खाव्या लागतील. आम्हांला लढण्यासाठी भाडोत्री लोक  लागत नाही. आम्ही दुसऱ्यांच्या खाद्यवर बंदूक ठेऊन लढत नाही. आमची हत्यारे आमचीच आहे आणि ती धार दार आहे. दोन घाव बसले की पाणी मागणार नाही, अशा कडक शब्दांत राऊतांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे.


राऊत यांनी यावेळी सांगितलं की, 'धर्माच्या आणि जातीच्या नावाने नाव खराब करण्याचं काम काही जण करत आहेत. खास करून महाराष्ट्रची बदनामी करण्याचा प्रयत्न काही असामाजिक संघटनाकडून करण्यात येत आहे. त्यांनी उत्तर देण्यास आणि परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार राहावं.'


महत्त्वाच्या बातम्या :