Sanjay Raut on BJP Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) हेआज (6 ऑगस्ट) रोजी मुंबईत तरुण पिढीशी थेट संवाद साधणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (NMACC) 'जनरेशन झी' (Gen Z) आणि 'जनरेशन अल्फा' (Gen Alpha) च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच या कार्यक्रमावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका करत जोरदार हल्लाबोल केला आहे. या जेन Z मध्ये नेमकं कोण आहेत? यात सगळी भाजप आणि संघ परिवारातली मुलं आणि नातवंड असल्याचेसंजयराऊतम्हणाले. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातवंड आणि मुलांशी बोलून काय उपयोग? अशी खोचक टीकाही त्यांनीकेलीय. (Sanjay Raut on BJP Mohan Bhagwat)

Continues below advertisement

Sanjay Raut: दिल्लीतील जंतर मंतरवर आलेल्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मी जेन Z समजतो.

माझ्यामते दिल्लीतील जंतर मंतरवर आलेल्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मी जेन Z समजतो. ज्यांनी सरकार विरोधात आक्रोश केला, असे असताना आजही पंतप्रधान मोदी त्यांच्यासमोर माफी मागून आणि शमा करून सुद्धा अमितशाहांचे पोलीस, यंत्रणा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना दमदाटी करताय, गुन्हे दाखल करतायत. त्यातली एक प्रिया नावाची मुलगी नुकतीच राहुल गांधी यांनाकाल भेटली, असे अनेक प्रकरण यामध्ये आहेत. त्यामुळे मोहन भागवत यांनी या मुलांशी बोललं पाहिजे. असासल्लाखासदारसंजयराऊतयांनीदिलाआहे. आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातवंड आणि मुलांशी बोलून काय उपयोग? अशी खोचक टीकाही त्यांनीकेलीय.

Continues below advertisement

Sanjay Raut: र तो लोकशाहीचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा मोठा विजय असेल

आम्ही निर्धास्त आहोत. कारण ज्यांनी बेईमानी केली, घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच भाषेत आम्ही संपवू. माझीअशी माहिती आहे की समोरच्या पक्षात चलबिचल सुरू झाली आहे. भाजप पक्षात मर्ज व्हायचं त्यांच्याकडे खल सुरू आहे. मात्र जर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आणि आमच्या सत्याच्या बाजूने निकाल दिला तर तो लोकशाहीचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा मोठा विजय असेल, असेही खासदार संजय राऊत म्हणाले. वारंवार फुटीरगटाचे नेते सांगत होते कि आमच्या मागे महाशक्ती आहे, हे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे.

दरम्यान, 2014 आणि 2019 च्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात झाल्या, त्यावेळी या फुटीर गटातले नेते सामील होते. त्यामुळे वैचारिक फूट आहे, असं म्हणता येणार नाही. कपिल सिब्बल यांचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलंय, परिणमी आज निकाल अपेक्षित आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या