Archana Patil Dharashiv: धाराशिव भाजपमध्ये (Dharashiv BJP) व्हाट्सअप स्टेटसवरून सुरू झालेल्या वादावर अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटलांकडून (Archana Patil) फेसबुक पोस्ट करत पडदा टाकण्याचाप्रयत्नकेलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अभूतपूर्व यशामुळे आपल्या एकजुटीला तडा जावा यासाठी काहींचे प्रयत्न असल्याचेत्यांनीसांगितलंय. सोशल मीडिया टीमकडून अनावधानाने मजकूर प्रसिद्ध झाला. मात्रयाकृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतअसल्याची फेसबुक पोस्ट करत अर्चना पाटील (Archana Patil)यांनीआपली भूमिका मांडली आहे. पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही प्राथमिकता असल्याचंही अर्चना पाटीलयांनी स्पष्टीकरण दिलंआहे.

Continues below advertisement

निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या भाजपच्या जुन्या नेत्यांनी तीस वर्षात पक्ष वाढीसाठी काय योगदान दिलं? अशाआशयाचे अर्चना पाटलांच्या व्हाट्सअप स्टेटसमुळे नवा वाद सुरू झाला होता. यावरून धाराशिच्याराजकीयवर्तुळातएकचखळबळउडालीहोती. तरया स्टेटसमुळे भाजपमध्येअंतर्गतवादउफाळूनआलाहोता. अशातचआता जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी फेसबुक पोस्ट करतघडलेल्याप्रकारावरदिलगिरीव्यक्तकेलीआहे.

Archana Patil : फेसबुक पोस्टमध्ये नेमकंकायम्हणाल्या अर्चना पाटील

Continues below advertisement

मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केल्याचे मला आताच समजले. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यात आपण सर्वांनी एकजुटीने आणि कुटुंबाच्या भावनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशामुळे काही घटकांकडून आपल्या एकजुटीला तडा जावा, असे प्रयत्न होत असले तरी, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील.

 Dharashiv BJP: नेमकंप्रकरणकाय?

धाराशिव भाजपातील जुने- नवे संघर्ष सुरू असताना गेल्या 30 वर्षांत पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा..." असा आव्हानच धाराशिवच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांनी भाजपमधील जुने आणि निष्ठावंत नेते यांना व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत दिले होते. या थेट आव्हानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार बसवराज पाटील यांच्या स्वागत कार्यक्रमात राणाजी विजयसिंह पाटील यांना वगळण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपमधील अनेक जुन्या नेत्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. त्यावेळी माजी आमदार सुजित सिंह ठाकुर यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे कोणत्याही एका कुटुंबाची पब्लिक प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, असं ठणकावलं होतं. आणि त्यानंतर आता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या या आव्हानात्मक स्टेटसने भाजपातील अंतर्गत वादाला नवे वळण दिल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल काळे प्रकरण, त्यानंतर बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यातील घडामोडी आणि जुने-नवे कार्यकर्त्यांमधील नाराजीमुळे धाराशिव भाजपातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. असताना, दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील यांनी पक्षातील जुन्या नेतृत्वालाच 30 वर्षांच्या योगदानाचा लेखाजोखा मांडण्याचे आव्हान दिले.