मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) खिचडी घोटाळ्याचे किंग असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे (BMC Khichdi Scam) किंग आहेत. राऊतांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली, असं म्हणत संजय निरुपम संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत निरुपम यांनी संजय राऊत, अमोल कीर्तीकरांसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.


खिचडी चोराला समन्स, निरुपम यांचा कीर्तीकरांवर निशाणा


ठाकरे गटाचे शिलेदार अमोल कीर्तीकर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स दिलं आहे. यावर निरुपम यांनी निशाणा साधला आहे. संजय निरुपम म्हणाले की, खिचडी चोराला आज समन्स आला आहे. या घोटळ्यात आणखी काही जण आहेत. माझ्या मित्राबद्दल बोलतोय वाईट वाटतंय. अमोल कीर्तीकरांना अटक करा, असं निरुपम म्हणाले आहेत. निरुपम काँग्रेस पक्षात असानाही त्यांनी मविआ उमेदवार अमोल कीर्तीकर यांना विरोध दर्शवला होता.


राऊत कुटुंबाकडून एक कोटीची दलाली - निरुपम


या खिचडी घोटाळ्याचे किंग आहेत संजय राऊत आहेत. हा जो घोटाळा झाला आहे, यामध्ये संजय राऊत यांनी आपल्या पत्नी भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे घेतले आहेत. सहयाद्री रिफ्रेशमेंटला खिचडीचा कंत्राट मिळाला होता. सहा कोटी रुपयाचा कंत्राट मिळाला होता. त्यातून एक कोटी रुपये संजय राऊत आणि कुटूंब मित्रांना मिळाले आहेत.  विधिता राऊत संजय राऊत यांची मुलगी आहे, तिच्या खात्यावर पैसे आले आहेत. 


निरुपम यांचे राऊत कुटुंबियांवर आरोप


राऊत कुटुंबाकडून एक कोटीची दलाली झाल्याचा गंभीर आरोप निरुपम यांनी केला आहे. संदीप राऊत यांना सुद्धा सहयाद्री रिफ्रेशमेंटकडून चेक आले आहेत आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. सहयाद्री रिफ्रेशमेंट 300 ग्राम खिचडी पॅकेट सप्लाय करण्याचा कंत्राट मिळाला होता.


संजय राऊतांना अटक करा, निरुपम यांची मागणी


अमोल कीर्तिकर फक्त खिचडी चोर नाही, तर संजय राऊत सुद्धा खिचडी चोर आहे. सहयाद्री रिफ्रेशमेंटने हे खिचडी वाटपाचा उप कंत्राट दिलं होतं. सह्याद्री रिफ्रेशमेन्टने खूप मोठा घोटाळा केला आहे. हे सगळं तेव्हा होत होतं, जेव्हा त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाइव्ह करत होते. खिचडी घोटाळा चौकशी करताना ईडीने चौकशी करताना त्यांनी सहयाद्री रिफ्रेशमेंट सोबत संजय राऊत यांना अटक करावी. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तेव्हा कळेल मुंबईतील मराठी माणसांवर तुम्ही राजकारण करताय. अमोल कीर्तिकर तर खिचडी चोर आहेतच, ज्यांनी उमेदवारी त्यांना दिली ते सुद्धा खिचडी चोर आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Amol Kirtikar : ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स