Saamana Editorial : ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Saamana) शरद पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. "शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण तरीही पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत," असं सामनाच्या अग्रलेखात (Editorial) लिहिण्यात आलं आहे. शरद पवार यांचं आत्मचित्र लोक माझे सांगाती (Lok Maze Sangati) या आत्मचरित्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर परखड शब्दात टीका करण्यात आली आहे. त्याचीच ही परतफेड आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये (BJP) जाण्यासाठी बॅगा भरुनच बसला होता, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.


काय म्हटलं आहे 'सामना'त?


शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्त्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयश ठरले आहेत. भाजपची पोटदुखी अशी की शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा प्लॅन होता. लोक बॅगा भरुन तयारच होते. येणाऱ्यांच्या लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था पूर्ण झाल्याचेही बोलले जात होते. मात्र पवारांच्या खेळीने भाजपचा प्लॅन कचऱ्याच्या टोपलीत गेला.


उद्धव ठाकरेंवरील टीकेला 'सामना'तून उत्तर?


शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत उद्धव ठाकरे यांना अपयशी मुख्यमंत्री म्हणण्यात आलं आहे किंवा उद्धव ठाकरेंसंदर्भात शरद पवारांनी केलेल्या लिखाणावरुन ठाकरे गटात नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. त्यानुसार सामनातून टीका होईल, अशी चर्चा होती. त्यानंतर आज शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली. सोबतच या शरद पवार यांचं कौतुक देखील करण्यात आलं आहे.


'सामना'तील टीकेवर शरद पवार म्हणतात...


दरम्यान सामनातून केलेल्या टीकेल शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवार म्हणाले की, "माझ्या वाचनात आलेलं नाही. पण मी वाचल्यावर मत देईन. मात्र सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करतो आणि एकत्र काम करत असताना पूर्ण माहितीवरच त्यावर भाष्य करणं योग्य होईल. नाहीतर उगाच गैरसमज होतात. माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल."


VIDEO : Sharad Pawar On Saamana Paper : 'सामना'तील भूमिका ऐक्याला पोषक असेल, अशी खात्री : शरद पवार